आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोणगावकरांचे सदस्यत्व रद्दच्या प्रस्तावाला बगल!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी मुख्याधिकारी सुरेश बेदमुथा यांना धक्काबुक्की केल्याची दखल सर्वसाधारण सभेने घ्यावी, असे विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी सुचवल्यानंतरही मंगळवारी होणाऱ्या सभेत प्रस्ताव ठेवण्यात आला नाही. संभाजी डोणगावकर यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी राजपत्रित अधिकारी संघटनेने लावून धरली आहे.
डोणगावकर बेदमुथा यांच्यात मागील महिन्यात विकास कामावरून जोरदार वादावादी झाली होती. दरम्यान, बेदमुथा भोवळ येऊन पडले होते. त्यांच्यावर आठ दिवस अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आले. त्यानंतर प्रकरण खूपच चिघळले होते. डोणगावकरांविरुद्ध क्रांती चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्यांना अद्याप अटक झालेली नाही. राजपत्रित अधिकारी संघटनेने पत्रकार परिषद घेऊन त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करत अतिरिक्त कार्यकारी मुख्याधिकारी मधुकरराजे अार्दड यांच्याकडे निवेदन सादर केले होते. अार्दड यांनी अहवाल विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांच्याकडे पाठवला होता. त्यावर सर्वसाधारण सभेत निर्णय घ्यावा, असे पत्राद्वारे दांगट यांनी जि. प. अध्यक्ष सीईओ यांना कळवले आहे.

अध्यक्षांकडे फाइल...
सर्वसाधारण सभेत डोणगावकर यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, यासाठी प्रशासनाच्या वतीने अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्याकडे फाइल पाठवण्यात आली आहे. त्यावर अध्यक्षांनीच निर्णय घेणे अपेक्षित होते. पण त्यांच्या पक्षाचा सदस्य असल्याने त्यांनी या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप अधिकाऱ्यांकडून होत आहे. याविषयी त्यांनी स्पष्ट केले की, समन्वयातून वाद मिटवण्याचे सांगितले. तसे झाल्यास ऐनवेळी हा विषय सभेपुढे येऊ शकतो.
बातम्या आणखी आहेत...