आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरी नव्हे, करिअर घडवा - सतीश मंडोरा

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नोकरी म्हणजे सुरक्षित करिअर हे समीकरण मध्यमवर्गीयांमध्ये आहे. त्यामुळे बहुतांश तरुण त्याच चौकटीत काम करतात. कौशल्याचा वापर केवळ सोपवलेल्या जबाबदारीपुरतेच असते. विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य पणाला लावून करिअर घडवणे आवश्यक आहे. जॉब नव्हे करिअर घडवा, असा मंत्र आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट ट्रेनर सतीश मंडोरा यांनी शनिवारी दिला.
‘दिव्य मराठी’ फाउंडेशनच्या वतीने तापडिया नाट्यमंदिरात जॉब आणि करिअरमध्ये काय फरक आहे हे समजावून सांगण्यासाठी ‘करिअर निवडा, जॉब नाही’ या विषयावर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक धनंजय लांबे होते.
मंडोरा म्हणाले, तुमची आवड नसेल तर ते काम तुम्ही आनंदाने करू शकत नाही. जे काम आनंद देते तेच करायला हवे. आज स्पध्रेत टिकण्यासाठी करिअर अवधी कमी झाला आहे. कमी वेळात खूप काही करण्याची चढाओढ सुरू आहे. यात संपूर्ण कौशल्य पणाला लावून तुम्हाला तुमचे स्थान निर्माण करायचे आहे. त्यासाठी अवघड प्रश्न स्वत:ला विचारा, वेळेनुसार आवडीतही बदल करा, असेही ते म्हणाले. प्रारंभी निवासी संपादक धनंजय लांबे यांनी प्रास्ताविक केले.