आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही हतबल होऊ नका, आम्ही कुणाकडे पाहावे? खैरेंच्या टीकेवर भाजपची खोचक प्रतिक्रिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ६२४ कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या प्रस्तावावरून खासदार खैरेंसारख्या नेत्यांनी हतबल होऊ नये. ते हतबल झाले तर आमच्यासारख्या युतीच्या कार्यकर्त्यांनी कोणाकडे पाहावे? अशी खवचट प्रतिक्रिया व्यक्त करीत भाजपच्या नेत्यांनी खासदार खैरे यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. खैरे युतीचे खासदार आहेत. त्यांनी फक्त शिवसेनेचे खासदार असल्यासारखे वागू नये. नरेंद्र मोदींच्या आशीर्वादामुळेच जनतेने त्यांना निवडून दिले आहे, असा टोलाही या नेत्यांनी लगावला आहे.

गतवर्षी जून महिन्यात खासदार चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांना औरंगाबाद शहरातील रस्त्यांच्या विकासासाठी ६२४ कोटी रुपयांचा निधी द्यावा, असा प्रस्ताव दिला होता. त्यात विविध रस्त्यांची कामे, सुशोभीकरण व इतर कामांसाठी निधीची मागणी केली होती. हा प्रस्ताव आपण एका महिन्यात मंजूर करून आणू, अशी घोषणाही खासदार खैरे यांनी केली होती. प्रत्यक्षात त्या प्रस्तावावर आजतागायत काहीच निर्णय झाला नाही. गुरुवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना त्यांनी हताश होत मोदी सरकार व भाजपवर टीका केली होती. मी काँग्रेसचे सरकार असताना दोन योजना आणल्या, पण ‘आमचे’ सरकार असताना मला वर्षभरात एक रुपयाही आणता आला नाही याचे वाईट वाटते, असे सांगत त्यांनी राज्य सरकारही शहरासाठी काही देऊ शकेल असे वाटत नाही, असे म्हटले होते. शिवाय भाजपच्या पुढा-यांनीही याकडे लक्ष द्यावे, असा टोलाही लगावला होता.
खासदार खैरे यांच्या या टोलेबाजीने भाजपमध्ये अस्वस्थता पसरली असून नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. खैरे यांनी व्यक्त केलेल्या हतबलतेवर खवचट प्रतिक्रिया देत या नेत्यांनी खैरे हे युतीचे नेते आहेत. त्यांनी हतबल होऊ नये. आमच्यासारख्या युतीच्या कार्यकर्त्यांनी कोणाकडे पाहावे? असा टोला लगावला.

पुढे वाचा... मोदींच्या आशीर्वादामुळे जनतेने निवडून दिले
बातम्या आणखी आहेत...