आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाइन फ्लूविषयी चिंतेचे कारण नाही, लक्षणे दिसताच रुग्णाला घाटीमध्ये दाखल करा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - स्वाइनफ्लूची लागण होईल, असे कोणतेही वातावरण औरंगाबादेत नाही. अशी लागण झालेला व्यक्ती रुग्णालयांमध्येही नाही. त्यामुळे कुठलेही काळजीचे, चिंतेचे कारण नाही, असे घाटी रुग्णालयातील औषधशास्त्र विभागप्रमुख डॉ. मंगला बोरकर यांनी स्पष्ट केले. अशी काही लागण आढळलीच तर उपचारासाठी घाटी प्रशासन सज्ज आहे. मात्र, कफ, खोकल्यासारखी लक्षणे दिसू लागताच घाटीमध्ये रुग्णाला दाखल करा, असे आवाहनही त्यांनी केले.

मूळ औरंगाबादेतील रहिवासी असलेले शब्बीर मुस्तफा हुसऔन दोन आठवड्यांपूर्वी मुंबईतून परतल्यावर त्यांनी घसा खवखवण्याची तक्रार केली. त्यांना समर्थनगरातील साई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथून मंगळवारी रात्री त्यांना घाटीमध्ये दाखल करण्यात आले; परंतु त्यांचा मृत्यू झाला.

यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने घाटी, तसेच खासगी रुग्णालय, मनपा आरोग्य विभाग, तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी शहरात स्वाइन फ्लूची लागण होण्याची शक्यता नाही, असे स्पष्ट करताना नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही केले. हुसऔन यांना मुंबईतच लागण झाली असावी, अशी शंका त्यांनी उपस्थित केली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जी. एन. गायकवाड म्हणाले की, एक जानेवारीपासून कालपर्यंत आम्ही दोन रुग्णांच्या लाळेचे नमुने पुण्याला तपासणीसाठी पाठवले. त्यापऔकी एकाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. हुसऔन यांचा अहवाल गुरुवारी रात्री पॉझिटीव्ह आला. घाटीचे अधीक्षक डॉ. सुहास जेवळीकर यांनी खासगी लॅबमध्ये केलेल्या तपासणीत हुसऔन यांना स्वाइन फ्लू झाल्याचे स्पष्ट होत असल्याचे सांगितले. पण सरकारी नियमानुसार पुण्यातून आलेल्या अहवालानंतरच त्यावर शिक्कामोर्तब होऊ शकते, असे ते म्हणाले. दरम्यान, मनपाच्या पथकाने गुरुवारी हुसऔन यांच्या दहा नातेवाइकांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून टॅमीफ्लूच्या गोळ्या दिल्या. मनपाच्या बन्सीलालनगर, एन-८, एन-११, सिल्क मिल कॉलनी, कैसर कॉलनीत तपासणीची सोय असल्याचे वऔद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना राणे म्हणाल्या.
(शासनमान्य प्रयोगशाळांतील तपासणीत स्वाइन फ्लू पॉझिटिव्हचा अहवाल असेल तर खासगी रुग्णालयातील रुग्णांना मनपाच्या आरोग्य केंद्रातून औषधी दिली जातात, असे आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी म्हणाल्या.)
* खासगी रुग्णालयातील रुग्णाच्या लाळेचे नमुने घेण्यासाठी घाटीकडून किट मिळणार नाही.
* अशा रुग्णाच्या नातेवाइकांनी संपर्क साधल्यावर तीन दिवसांची औषधी दिली जातात.
* घाटीत स्वाइन फ्लूसाठी स्वतंत्र विभाग उपलब्ध आहे. तेथेच रुग्णाला दाखल करणे कधीही उपयुक्त ठरेल.
खासगी रुग्णालयात स्वाइन फ्लूचा संशयित रुग्ण असेल तर त्याच्यावर उपचाराचे काय, असा प्रश्न डॉ. बोरकर यांना विचारला असता त्यांनी दिलेले उत्तर असे.

घाटीत औषधी मिळेल
औषधे मिळाली नाही
- हुसऔनयांना स्वाइन फ्लू झाल्याचा संशय आल्याने आम्ही तशी औषधी मागवली होती. ती कुठल्याच औषधी दुकानांमधून मिळत नव्हती. दरम्यान, रुग्णाला त्याच्या नातेवाइकांनी घाटीत हलवले. डॉ.आनंद देशमुख, साई हॉस्पिटल
दवाईकहीं नही मिली

- ‘साई’च्याडॉक्टरांनी सांगितल्यानुसार आम्ही लाळेचे नमुने मुंबईच्या प्रयोगशाळेला पाठवले. दरम्यान, स्वाइन फ्लू साठीचे "ओसेल्टामवीर' हे औषध मी बजाज, हेडगेवार, एमजीएम रुग्णालयांच्या औषधी विक्री दुकानात शोधले होते; पण ते उपलब्ध नव्हते. जाहेदहुसऔन, रुग्णाचे भाऊ

औषधीप्रिस्क्रिप्शनशिवाय नाही
- स्वाइनफ्लूवर सिप्ला कंपनीच्या फ्लूवीर या गोळ्या (४०० रुपयांत दहा) उपलब्ध आहेत. पण डॉक्टरांचे मूळ आणि ड्युप्लिकेट प्रिस्क्रिप्शन, डॉक्टरांचा रजिस्ट्रेशन क्रमांक असा तपशील असेल तरच या गोळ्या देतो. प्रवीणकुलकर्णी, सचिव, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन
एमजीएम मेडिसिन विभागप्रमुख डॉ. एस. एच. तालिब यांनी स्वाइन फ्लूविषयी माहिती दिली. ती अशी..

१. स्वाइन फ्लू कसा पसरतो.
उ. हासंसर्गजन्य आजार आहे. त्याची लागण नाकातील लायनिंग पेशी, घसा आणि फुप्फुसातून होते. संसर्ग झालेल्या जागांना स्पर्श झाल्यास किंवा हवेतून या विषाणूंचा संसर्ग होतो. लक्षणे दिसण्याच्या एक दिवस आधी आणि नंतर दिवसांपर्यंत रुग्णापासून इतरांना लागण होऊ शकते. लहान मुलांना १० दिवसांपर्यंत लागण होऊ शकते.
२.या रोगाची लक्षणे काय?
उ. कफ,ताप येणे, घसा खवखवणे, नाक चोंदले जाणे किंवा वाहणे, अंग दुखणे, डोके दुखणे, मळमळणे.
३.हा आजार जीवघेणा का?
उ. यातन्युमोनिया होऊन अतिशय झपाट्याने श्वसन यंत्रणा नष्ट होते.
४.स्वाइन फ्लू झाल्याचे कसे ओळखता येईल?
उ. प्रयोगशाळेतलाळेच्या नमुन्याची तपासणी करून घ्यावी.
५.उपचार कोणते आहेत?
उ. आरामकरावा. जास्तीत जास्त कोमट पाणी प्यावे. अँटिव्हायरल, अँटिबायोटिक्स घ्यावीत.