आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dound Nanded Railway Engine Problem In Aurangabad

रेल्वे इंजिन बिघडल्याने प्रवासी 5 तास अडकले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - दौंड-नांदेड रेल्वेचे इंजिन रविवारी रात्री नगरसोल येथे बिघडले. त्यामुळे नगरसोल-नांदेड गाडीचे इंजिन लावून ती रेल्वे रवाना करण्यात आली. मात्र त्याच वेळी नगरसोल-नांदेड गाडीसाठी तत्काळ पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. 7 तास उशिराने बदली इंजिन पाठवण्यात आले. त्याचा फटका औरंगाबादेतील सुमारे एक हजार प्रवाशांना बसला. त्यांचे पाच तास हाल झाले. अनेक चाकरमानी वेळेवर कार्यालयात पोहोचू शकले नाहीत.

दौंड-नांदेड रेल्वेगाडीच्या इंजिनची दुरुस्ती करण्याचा स्थानिक कर्मचार्‍यांनी प्रयत्न करून पाहिला, पण त्यांना अपयश आले. अखेर त्यांनी त्या रेल्वेला औरंगाबादकडे जाणार्‍या नगरसोल - नांदेड या गाडीचे इंजिन लावले आणि ती रवाना केली. त्याची माहिती औरंगाबाद स्थानकाला सोमवारी सकाळी सातच्या सुमारास कळवण्यात आली. मग येथील स्टेशन व्यवस्थापक अशोक निकम यांनी वरिष्ठांशी चर्चा केली. त्यानंतर औरंगाबाद स्थानकातील एक अतिरिक्त इंजिन सकाळी नऊ वाजता नगरसोलकडे (औरंगाबाद-नगरसोल अंतर सुमारे 150 किलोमीटर आहे.) रवाना करण्यात आले. परिणामी सकाळी साडेनऊ वाजता औरंगाबाद स्थानकावर पोहोचणारी नगरसोल -नांदेड पॅसेंजर दुपारी अडीच वाजता पोहोचली. प्रवाशांनी निकम यांना धारेवर धरले. निरोप मिळाल्यावर तत्काळ इंजिन रवाना करण्यात आले आहे, एवढेच निकम यांनी सांगितले.