आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लगीनघाई : नॅक समितीच्या आगमनापूर्वी विद्यापीठाच्या विकासकामांना गती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मूल्यांकन करण्यासाठी नॅक समिती लवकरच येणार आहे. त्यापूर्वीच विद्यापीठातील विविध विकासकामांना गती देऊन भौतिक विकास साधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
यूजीसीच्या 11 व्या योजनेत विद्यापीठाला निधी मिळाला असून विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. जवळपास सात कोटी रुपयांच्या इमारत नूतनीकरणाचे 14 कामांचा त्यात समावेश आहे. त्यापैकी 11 कामांवर इस्टेट विभागाचे नियंत्रण आहे. शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 1 कोटी 25 लाख रुपये खर्च करून शिक्षणशास्त्र विभागाच्या इमारतीचे काम सुरू आहे. तसेच संस्कृत आणि मानसशास्त्र विभागाच्या विस्तारीकरणावर 50 लाख रुपये खर्च करण्यात येत आहे. वर्गखोल्या आणि परिषद कक्ष उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. स्पोर्ट्स अँथोरिटी ऑफ इंडियाच्या (साई) परिसराकडे विद्यापीठाच्या लॉ स्कूलची इमारत उभारली जात आहे. त्यासाठी 3 कोटी 25 लाख रुपये खर्च येणार आहे.
वृत्तपत्र व जनसंवाद विभागाच्या इमारत विस्तारीकरणाचेही काम अंतिम टप्प्यात असून यामध्ये सुमारे वीस लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. फाइन आर्ट आणि ग्रंथालयशास्त्र इमारत विस्तारीकरणासाठी प्रत्येकी दहा लाख रुपये खर्च होत आहे. शिक्षणशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र विभागाच्या परिषद कक्षासाठी प्रत्येकी 20 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
नाट्यशास्त्र विभागाच्या सभागृहासाठी 5 लाख, रसायणशास्त्र आणि संगणकशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेसाठी प्रत्येकी पाच लाख रुपये खर्च होत आहे, तर 15 लाख खर्चून गणित, सांख्यिकी आणि पर्यावरणशास्त्र विभागाच्या पहिल्या मजल्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तीन्ही विभागांसाठी वर्गखोल्या तयार करण्याचे काम सुरू आहे. उस्मानाबाद येथील उपकेंद्रासाठी 60 लाख रुपये खर्च करून मध्यवर्ती ग्रंथालयाचे बांधकाम केले जात आहे. तसेच वाचन कक्षाचेही काम सुरू आहे. सर्व कामांवर कार्यकारी अभियंता काळे यांचे नियंत्रण असून लवकरच ही कामे पूर्ण होतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.
वसतिगृहांना मंजुरी
विद्यापीठातील अल्पसंख्याक मुलींचे एक भव्य वसतिगृह मंजूर झाले असून त्यासाठी 4 कोटी 84 लाख रुपये देण्यात आले.
तर आदिवासी मुलांसाठी 1 हजार क्षमतेचे, 500 क्षमतेचे मुलींसाठी वसतिगृह तयार केले जाणार आहे.