आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Babasaheb Ambedkar University History Department Issue

इतिहास विभागाचा पदभार डॉ. बगाडेंकडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाठा विद्यापीठातील इतिहास व प्राचीन भारतीय संस्कृती विभागाचे विभागप्रमुख डॉ. पी. ए. गवळी यांनी आपला पदभार प्रख्यात इतिहास संशोधक प्रा. डॉ. उमेश बगाडे यांच्याकडे सोपवला आहे. यापूर्वीच 10 जानेवारीला कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांच्याकडे डॉ. गवळी यांनी राजीनामा दिला होता.

‘इतिहास विभागप्रमुख डॉ. गवळींचा राजीनामा’ हे वृत्त ‘दिव्य मराठी’ने 15 जानेवारीच्या अंकात प्रसिद्ध केले. कुलगुरूंनी चर्चेतून मार्ग काढण्याचे सांगितले होते. मात्र, विभागप्रमुखपदी राहण्यास स्वारस्य नसल्याचे त्यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले होते. त्यामुळे त्यांनी पदभार डॉ. बगाडे यांच्याकडे दिला. मंगळवारी काम करून बुधवारपासून ते 20 दिवसांच्या रजेवर गेले आहेत. 4 फेब्रुवारीला विभागात येणार असून 6 फेब्रुवारीपर्यंत काम पाहणार आहेत. त्यानंतर पुन्हा 20 दिवसांची सुटी घेणार आहेत. त्यामुळे कुलगुरूंनी राजीनामा अद्याप मंजूर केला नसला तरी विभागप्रमुखपद त्यांनी डॉ. बगाडे यांच्याकडे सोपवले आहे.