आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.babasaheb Ambedkar Marathwada University Student Conference Issue

विद्यापीठातील संसद उद्‍घाटनच्या दोन चुली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी प्रतिनिधींचे अध्यक्षा आणि सचिवांच्या विद्यार्थी परिषदेचे उद्‍घाटन 24 जानेवारीला होणार आहे. दोघेही राष्ट्रवादीचे असल्याने खासदार सुप्रिया सुळे यांना निमंत्रित केले आहे.

विद्यापीठ विभाग संसदेच्या उद्घाटनासाठी मात्र युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना बोलावावे लागणार असल्याचे विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. वाल्मीक सरवदे यांनी सांगितले. या कार्यक्रमाची तारीख जाहीर झालेली नाही. विद्यापीठ संसदेचे सचिव वर्षा खेडकर युवा सेनेच्या उमेदवारीवर निवडून आली आहे. तर विद्यार्थी परिषद अध्यक्षा कल्याणी शिंदे आणि सचिव सोनाली दहातोंडे हिची सचिवपदी राष्ट्रवादीकडून निवड झाली आहे. त्यामुळे या दोघींची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन करून घेण्याला पसंती आहे. गतवर्षी दोन्ही उद्घाटने एकाच कार्यक्रमात झाली होती. यंदा मात्र दोन वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत. 24 जानेवारीला सकाळी 11 वाजता नाट्यगृहात उद्घाटन होईल.