आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Babasaheb Ambedkar Marathwada University Crime Issue

विद्यापीठात प्राध्यापिकेचा विनयभंग; आरोपी प्राध्यापकाविरुद्ध अटक वॉरंट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील 36 वर्षीय प्राध्यापिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी इतिहास विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. नीरज अण्णासाहेब साळुंके यांच्याविरुद्ध प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वैशाली पाटील यांनी अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्याचे आदेश दिले. 13 ऑगस्ट 2012 रोजी संबंधित प्राध्यापिकेने डॉ. साळुंके यांच्याविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात विनयभंग केल्याची तक्रार नोंदवली. प्रकरण साक्षी-पुराव्यासाठी आले असताना आरोपीच्या वतीने गैरहजर राहण्यासंबंधी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, सरकारपक्षाच्या वतीने या अर्जास आक्षेप घेण्यात आला. सुनावणीअंती न्यायालयाने साळुंकेविरुद्ध वॉरंट बजावण्याचे आदेश दिले आहे.