आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला 419 संलग्न महाविद्यालये आहेत. त्यापैकी 112 अनुदानित असून 5 शासकीय महाविद्यालये सोडली तर उर्वरित जवळपास 302 महाविद्यालयांचा कारभार प्राचार्यांशिवाय सुरू आहे. बीसीयूडी संचालक डॉ. मुरलीधर शिनगारे यांच्या निष्काळजी वृत्तीने उच्चशिक्षणाचे नुकसान होत असल्याचा गंभीर आरोप मुप्टाचे अध्यक्ष डॉ. शंकर अंभोरे यांनी केला आहे.
औरंगाबाद, बीड, जालना आणि उस्मानाबाद चारही जिल्ह्यांतील विनाअनुदानित महाविद्यालयांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. 419 पैकी 112 अनुदानित आणि 5 शासकीय महाविद्यालयांनीच प्राचार्यांची नेमणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित 302 कायम विनाअनुदानित महाविद्यालयांचा कारभार ‘रामभरोसे’ सुरू आहे. ‘बोर्ड ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट’ (बीसीयूडी) या मंडळाच्या संचालकपदी डॉ. शिनगारे हे कार्यरत आहेत. मात्र, त्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे उच्चशिक्षणाचे नुकसान होत असल्याचे मत महाराष्ट्र अंडरप्रिव्हिलेज्ड टीचर्स असोसिएशनचे (मुप्टा) अध्यक्ष डॉ. शंकर अंभोरे यांनी केला आहे. त्यांनी बीसीयूडीचा पदभार घेतल्यानंतर अनुदानित महाविद्यालयांतील अनुशेष अथवा प्राचार्यांशिवाय महाविद्यालयांवर काहीच कारवाई केल्याचे ऐकिवात नसल्याचेही डॉ. अंभोरे यांनी म्हटले आहे. डॉ. शिनगारे येण्यापूर्वी विद्यापीठ प्रशासनाने महाविद्यालयांना वारंवार पत्रे देऊन प्राचार्यांची नेमणूक करण्याचे सूचित केले आहे. प्रसंगी संलग्नीकरण काढून घेण्याचेही बजावण्यात आले होते, मात्र डॉ. मुरलीधर शिनगारे आल्यानंतर काहीच कारवाई झाली नसल्याचे उघड झाले आहे.
बायोमेट्रिक उपकरणालाही जुमानले नाही
उच्चशिक्षणात गुणवत्ता राहावी म्हणून राज्य शासनाने जानेवारी 2011 मध्ये महाविद्यालयांना बायोमेट्रिक यंत्र बसवणे बंधनकारक केले आहे. प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक यंत्र बसवणार्या महाविद्यालयांची संख्या निव्वळ 65 आहे.
बायोमेट्रिक यंत्र बसवणारी सर्वाधिक 22 महाविद्यालये बीड जिल्ह्यातील आहेत. त्यानंतर 21 औरंगाबादेतील आहेत. 47 महाविद्यालयांपैकी 22 महाविद्यालयांनी यंत्राची खरेदी केली असून 25 महाविद्यालयांचे इन्स्टॉलेशन झालेले नसल्याची माहिती आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.