आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.babasaheb Ambedkar Marathwada University Issue Aurangabad

काटकसर घोषित करणार्‍या कुलगुरूंनी घेतले प्रबोधिनीतील भाषणांचे मानधन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी स्वत:च्याच विद्यापीठात दिलेल्या भाषणांचे नियमबाहय़पणे मानधन घेतले असून माहितीच्या अधिकारातून ही बाब उघडकीस आली आहे. स्वत:च्या कार्यक्षेत्रातील प्रबोधिनीच्या भाषणांचे मानधन घेणारे डॉ. पांढरीपांडे हे गेल्या 55 वर्षातील पहिलेच कुलगुरू आहेत. कुलगुरुपदी रुजू होताच काटकसर वर्ष (2011-12) घोषित करणार्‍या डॉ. पांढरीपांडे यांनी चार भाषणांचे तीन हजार रुपये घेतले.

विद्यापीठातील इंग्रजी विभागाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. काशीनाथ रणवीर यांनी मिळवलेल्या माहितीच्या अधिकारातून हा प्रकार उघडकीस आला आहे. पाच जानेवारी 2011 रोजी डॉ. पांढरीपांडे यांनी कुलगुरुपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी अनेक धडाकेबाज निर्णय घेतले, काटकसरीचे वर्ष साजरे करण्याचे निर्देश सर्व विभागप्रमुखांना दिले होते. मात्र, अकॅडमिक स्टाफ कॉलेज (विद्या प्रबोधिनी) मध्ये दिलेल्या भाषणांचे मानधन घेतले आहे. प्राध्यापकांसाठी उजळणी आणि उद्बोधन वर्ग घेऊन त्यांच्या शिकवणी पद्धतीत बदल घडवणे विद्या प्रबोधिनीचे कर्तव्यच आहे. या उपक्रमाअंतर्गत विविध भागातील तज्ज्ञांना पाचारण करून प्राध्यापकांचे प्रबोधन केले जाते.

चार भाषणांचे मानधन तीन हजार रुपये
कुलगुरूंनीही तज्ज्ञ मार्गदर्शकाच्या रूपात ‘शिक्षकांची भूमिका आणि जबाबदारी’ या विषयावर चार भाषणे दिली आहेत. 29 मार्च आणि 20 जून 2011 रोजी दोन भाषणे दिली असून त्या बदल्यात प्रत्येकी हजार रुपये घेतले. त्यानंतर 10 ऑक्टोबर आणि 11 नोव्हेंबर 2011 दरम्यानच्या दोन भाषणांचे प्रत्येकी पाचशे रुपये घेतले आहे. तीन हजार रुपये त्यांना धनादेशाद्वारे अदा केले असून त्यांनी स्वीकारल्याचेही मान्य केले. डॉ. रणवीर यांनी 21 डिसेंबर 2011 रोजी माहितीसाठी अर्ज केला होता, 12 जानेवारीला विद्या प्रबोधिनीचे संचालक डॉ. महेंद्र शिरसाट यांनी माहिती उपलब्ध करून दिली. यूजीसीचा नियम 6.6 अन्वये तज्ज्ञ व्यक्तींना (विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राबाहेरील) मानधन देण्याची तरतूद असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

कुलगुरूंना मिळतो दरमहा एक लाख रुपये पगार
कुलगुरू हे पद मानाचे असून एक लाख रुपयांचे त्यांना वेतन देण्यात येते. त्याशिवाय निवासस्थान, मोटार, स्वयंपाकी, बागकाम इत्यादी कामांसाठी विद्यापीठाच्या आस्थापनेचे कर्मचारी कार्यरत असतात. त्यासाठी त्यांच्या वेतनातून कुठलीही कपात केली जात नाही. बैठकांसाठी विमानाचा खर्च आणि जिल्हय़ांतील दौर्‍याचे भत्ते त्यांना घेता येतात.

डॉ. जनार्दन वाघमारे माजी कुलगुरू, स्वारातीम विद्यापीठ, नांदेड

प्रश्न ज्याचा त्याचा
डॉ. शिवराज नाकाडे, माजी कुलगुरू (4.11.94 ते 3.11.99)
विठ्ठलराव घुगे माजी कुलगुरू(19.9.1991 ते 15.9.94)

काय आदर्श घेणार?
जबाबदार व्यक्तीने घेऊ नये
प्रश्न : आपल्याच विद्यापीठात कुलगुरूंनी भाषणासाठी मानधन घ्यावे का?
उत्तर : नियमात बसते म्हणून दिले जाते. अर्थात कुलगुरूंनी मानधन स्वीकारावे की नाही हा ज्याचा त्याचा मुद्दा असून प्रत्येकाच्या मूल्यांवर अवलंबून आहे. मात्र नैतिकदृष्ट्या अयोग्य आहे.
प्रश्न : मानधन घेणे नियमात बसते का?
उत्तर : बसते, पण घेऊ नये.
प्रश्न : आपण मानधन घेतले होते का?
उत्तर : स्वत:च्या विद्यापीठात तर अजिबातच नाही. बाहेरच्या संस्थांकडूनही घेतले नाही. कुलगुरू, नगराध्यक्ष असतानाही नाही आणि आता खासदार म्हणूनही प्रवासखर्च अथवा मानधन घेत नाही.
प्रश्न : आपल्याच विद्यापीठात कुलगुरूंनी भाषणाचे मानधन घ्यावे का?
उत्तर : कुलगुरू विद्यापीठातील जबाबदार व्यक्ती असून संस्थात्मक प्रमुख आहे. त्यामुळे त्यांनी आपल्याच विद्यापीठात भाषणासाठी मानधन घेणे योग्य नाही.
प्रश्न : मानधन घेण्याचा नियम आहे का?
उत्तर : यूजीसीच्या नियमानुसार बाहेरील तज्ज्ञ व्यक्तींना मानधन देता येते, पण कुलगुरूंनी स्वत:च तज्ज्ञ व्यक्ती म्हणून मानधन घेणे सर्वार्थाने गैर आहे. मंजूर करणार्‍या अधिकार्‍याने स्वत:साठी पैसे मंजूर करून घेणे अयोग्य आहे.
प्रश्न : आपण मानधन घेतले होते काय ?
उत्तर :नियमाला धरून नाही आणि नैतिकतेच्या दृष्टीनेही ते गैर असल्याने मी कधीही मानधन घेतले नाही. विद्यापीठातच काय, बाहेरच्या संस्थांमध्ये भाषणे दिली, पण तेथेही मानधन अथवा प्रवासखर्च यापूर्वी घेतलेला नाही.
प्रश्न : आपल्याच विद्यापीठात कुलगुरूंनी भाषणाचे मानधन घ्यावे का?
उत्तर : कुलगुरू हे पदच इतके मोठे आहे की समाज, विद्यार्थी, शिक्षकांसमोर आपल्या कामाचा आदर्श ठेवावा. दुसर्‍या संस्थेतही मानधन घेऊ नये, पण जर स्वत:च्याच विद्यापीठात मानधन घेतले असेल तर ही कुलगुरुपदासाठी अशोभनीय गोष्ट आहे.
प्रश्न : मानधन घेण्याचा नियम आहे का?
उत्तर : दुसर्‍या तज्ज्ञांना भाषणासाठी पाचारण करून मानधन देण्याचा नियम आहे, पण स्वत:साठी मानधन घेण्याचा नियम कसा काय असू शकेल? नैतिकदृष्ट्याही अयोग्यच आहे.
प्रश्न : आपण मानधन घेतले होते का?
उत्तर : अजिबात नाही. विद्यापीठात तर सोडाच, पण महाविद्यालयातही घेतले नाही. अनेक वेळा महाविद्यालयांनी दिले पण मी परत केले. त्याशिवाय कमीत कमी इंधन वापरणारा मी कुलगुरू होतो.

विद्या प्रबोधिनीमधील भाषणांचे मानधन घेणे कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या बरोबर आहे काय, याबाबत ‘दिव्य मराठी’ने तीन माजी कुलगुरूंना प्रश्न विचारले ते त्यांच्याच शब्दांत..

तीन माजी कुलगुरूंना विचारलेले प्रश्न आणि उत्तरे अशी
नकळत झाले, पण गैर नाही
डॉ. विजय पांढरीपांडे, कुलगुरू (5.1.2011 ते आजतागायत)
प्रश्न : आपल्याच विद्यापीठात कुलगुरूंनी भाषणाचे मानधन घ्यावे का.?
उत्तर : कुलगुरू म्हणून आल्यानंतर नकळत घेण्यात आले असेल. कारण मला नियम माहीत नव्हते. मानधन घेणे योग्य की अयोग्य, असे म्हणाल तर त्यात काहीच गैर नाही असे मला वाटते. पुढे मात्र अनेक भाषणे दिली, त्याचे मानधन घेतलेले नाही.
प्रश्न : मानधन घेण्याचा नियम आहे का..?
उत्तर : होय आहे.

..मग मानधन कशाचे ?
कुलगुरू, बीसीयूडी संचालक, कुलसचिव आदी अधिकारी परिसरातच राहतात. मग त्यांनी प्रवासखर्च अथवा मानधन घेणे अजिबातच योग्य नाही. यूजीसीचा तसा नियमसुद्धा नाही. प्रा. गजानन सुरासे, माजी कुलसचिव