आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dr. Babasaheb Ambedkar Marathwada Univesity Shodhgangotri

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शोधगंगोत्री’ उभारण्याचा विद्यापीठाचा निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पीएच.डी.च्या शोधप्रबंधांची ‘शोधगंगोत्री’ निर्माण केली जाणार आहे. विद्यापीठ आणि अहमदाबाद येथील यूजीसी इन्फिलनेट यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराला रविवारी (17 फेब्रुवारी ) कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पदवी प्रमाणपत्राला 31 मार्चपर्यंत विलंब शुल्क न आकारण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांनी संशोधन करून सादर केलेल्या पीएच.डी.ची एक बँक तयार केली जाणार आहे. त्यासाठी ‘शोधगंगा’ किंवा ‘शोधगंगोत्री’ असे नाव देण्यात येणार आहे. सर्व प्रबंध एका शृंखलेत बांधण्यासाठी अहमदाबाद येथील यूजीसी इन्फिलनेट या संस्थेसोबत केलेल्या कराराला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. त्याशिवाय दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पदवीचे विलंब शुल्क आकारण्यात येणार नाही. त्यासाठी 31 मार्चपर्यंत आणखी मुदतवाढ दिली आहे. आपत्कालीन विद्यार्थी कल्याण निधीचे स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून त्यामध्ये दुष्काळी मदत करण्यासाठी निधी जमा करण्यात येत आहे. कुलगुरूंच्या अध्यक्षतेत समिती नियुक्त करण्यात आली असून व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रत्नदीप देशमुख आणि डॉ. गीता पाटील, वित्त व लेखाधिकारी डॉ. शिवाजी सांगळे यांचा सदस्य म्हणून, तर कुलसचिवांना सदस्य सचिव म्हणून नियुक्त केले आहे.