आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dr. Narendra Dabholkar Murder Issue Aurangabad Connection

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणी औरंगाबादेतील 150 दुचाकींची यादी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचे धागेदोरे औरंगाबादपर्यंत असल्याचा संशय पोलिसांना असून पुण्याहून दीडशे संशयित दुचाकींच्या क्रमांकांची यादी पोलिस आयुक्त संजयकुमार यांना पाठवण्यात आली आहे.

हल्लेखोरांनी वापरलेल्या दुचाकीचा अजून शोध लागलेला नाही. 23 ऑगस्ट रोजी पोलिसांनी नगर येथील दोन तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. पोलिस 8566 या क्रमांकाच्या दुचाकीचा शोध घेत असून या क्रमांकाच्या संशयित दुचाकीस्वारांचा शोध घेण्यासाठी पुण्याहून दुचाकीच्या क्रमांकांची यादी पोलिस आयुक्त संजयकुमार यांना पाठवण्यात आली आहे. पुण्याहून या क्रमांकाची दुचाकी 21 ऑगस्ट अथवा 22 ऑगस्ट रोजी शहरात आली होती का? याचा शोध सुरू असून त्या अनुषंगाने मोबाइलचा डाटाही गोळा करणे सुरू असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी बुधवारी दिली.