आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Blood Donation

2200 भीमसैनिकांचे विक्रमी रक्तदान!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 57 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरात प्रथमच 2057 अनुयायांनी रक्तदान करून अभिवादन केले. ऑल इंडिया भिक्खू संघ व मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला.
नागसेनवन, विद्यापीठ नाट्यगृह, कैलास शिल्प मंगल कार्यालय, शासकीय मुलांचे वसतिगृह किलेअर्क, त्रिरत्न बुद्ध विहार, उस्मानपुरा म. फुलेनगर येथील मैत्री बुद्धविहारात रक्तदान करण्यात आले.
रक्तदानासाठी नागरिकांनी मिलिंद परिसरात रांगा लावल्या होत्या. मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी प्रथम रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन केले. विभागीय आयुक्त संजयकुमार जैस्वाल, जिल्हाधिकारी विक्रमकुमार, महापौर कला ओझा, स्थायीचे सभापती नारायण कुचे, भदंत बोधिपालो महाथेरो, सनदी अधिकारी आर. के. गायकवाड, निवृत्त शहर अभियंता एम. डी. सोनवणे, लेखाधिकारी संजय पवार, नगरसेवक कृष्णा बनकर, मिलिंद दाभाडे, विजयेंद्र जाधव, रूपचंद वाघमारे, प्रमोद राठोड, प्राचार्या वैशाली प्रधान, डॉ. अभिजित वाडेकर, राहुल मोरे, डॉ. अरविंद गायकवाड, चेतन शिंदे यांची उपस्थिती होती. नगरसेवक राजू शिंदे यांनी मसनतपूर येथे 125, तर एमआयडीसीत 200 रक्तदात्यांचे शिबिर घडवून आणले. विद्यापीठ परिसरात कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे, कुलसचिव डॉ. धनराज माने, विद्यार्थी कल्याण समितीच्या संचालक डॉ. चेतना सोनकांबळे यांचे सहकार्य लाभले.