आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University 54th Convocation Ceremony

शिक्षण म्हणजेच उद्याचे भविष्य : डॉ. माशेलकर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आगामी काळात ‘ई इक्वल टू एफ’ असाच फॉर्म्युला राहणार आहे. ई म्हणजे एज्युकेशन आणि एफ म्हणजे फ्युचर होय. आगामी काळात शिक्षण हाच भविष्याचा मूलमंत्र राहील, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले. शिक्षणाच्या माध्यमातून संशोधनाचा प्रवास हा नावीन्यपूर्ण, ध्येयवाद आणि सामाजिक जाणिवांतून झाला तरच त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेला फायदा होईल, असेही ते म्हणाले.
सीएमआयए, आस्था फाउंडेशन आणि देवगिरी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी देवगिरी महाविद्यालयात आयोजित यशवंत व्याख्यानमालेत ते बोलत होते. डॉ. माशेलकर पुढे म्हणाले, आगामी काळात शिक्षणच प्रत्येकाचे भवितव्य ठरवणार असून भारताची प्रगतीही यावरच अवलंबून आहे. सरस्वती आणि लक्ष्मीचा प्रवास सोबतच होणार आहे. संशोधनाचा फायदा सामान्यांना कमी किमतीत झाला तरच त्यांचे भले होईल. त्यामुळे या दृष्टीनेच प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
देशातील अर्थव्यवस्थेचे सूत्र समान असायला हवे. त्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर द्यायला हवा. भारताच्या प्रगतीचे आकडे हे एक अंकी आहेत. संशोधनाचा लाभ सर्वसामान्यांना झाला तर ते दोन अंकी होऊन विकासाचे उद्दिष्ट साध्य करता येईल. भारतीय अर्थव्यवस्थेतील असमानतेने श्रीमंतांना अधिक श्रीमंत केले तर गरिबांना अधिक गरीब केले. त्यामुळे संशोधनाचा फायदा सामान्याला झाला तर श्रीमंत आणि गरीब यांच्यातील अतंर कमी होईल, असेही डॉ. माशेलकर म्हणाले. भारतात काहीही चालते, जुगाड करता येतो ही भावना आहे. मात्र ही जुगाड संस्कृती कामाची नाही. ध्येयवादाने झपाटल्यावर काय होऊ शकते, याचे त्यांनी काही दाखलेही दिले.
या वेळी व्यासपीठावर अप्पासाहेब पाटील, प्राचार्य उल्हास शिऊरकर, सीएमआयएचे अध्यक्ष मिलिंद कंक उपस्थित होते. मुकुंद कुलकर्णी यांनी प्रास्तविक केले, तर आशिष गर्दे यांनी आभार मानले.