आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Find P.hD Guides Inelifible

होय, 26 पीएचडी गाइड बोगस! आणखी बोगस गाइड असण्याचा संशय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 26 पीएचडी गाइड बोगस असल्याचे अखेर विद्यापीठाने मान्य केले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत विद्यापीठ प्रशासनाने दिले आहेत.
व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांनी विद्यापीठात सुमारे 65 पीएचडी गाइड बोगस असल्याची तक्रार वर्षभरापूर्वी कुलगुरूंकडे केली होती. यापूर्वी समिती नेमून व्यवस्थापन परिषद, बीयूटीआरच्या बैठकांमध्ये अहवालाची टोलवाटोलवी करण्यात आली होती. मात्र, राज्यपाल के. शंकरनारायणन यांना 17 ऑक्टोबर 2013 रोजी पत्र पाठवून 26 मार्गदर्शक बोगस असल्याचे मान्य करत त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
विद्यापीठ प्रशासनाने यासंदर्भात काही महिन्यांपूर्वी राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्याकडे बोगस पीएचडी गाइडसंदर्भात पत्र पाठवले होते. या पत्रामध्ये 26 गाइड बोगस असल्याचे विद्यापीठाने मान्य केले होते. हे पत्र 17 ऑक्टोबर 2013 रोजी पाठवण्यात आले, मात्र बदनामीच्या भीतीपोटी माहिती दडवून ठेवण्यात आली. त्यामुळे वृत्त बाहेर येऊ शकले नाही. ज्या समितीने त्यांना गाइडशिप बहाल केली त्या समितीवर काय कारवाई होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याविषयी बीसीयूडीचे संचालक डॉ. एस. पी. झांबरे यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने केला; परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
व्यवस्थापन परिषद सदस्य निंबाळकर यांनी कुलगुरूंकडे तक्रार दाखल केल्यानंतर चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यास उशीर झाला. तसेच डॉ. अशोक मोहेकर आणि डॉ. महेंद्र शिरसाट यांच्या समितीने अहवाल सादर केल्यानंतर तो व्यवस्थापन परिषद तसेच बीयूटीआरच्या (बोर्ड ऑफ युनिव्हर्सिटीज टीचिंग अँड रिसर्च) सभेत ठेवला. यामध्ये बराच कालापव्यय झाला आणि प्रत्यक्ष कारवाईमध्ये पुन्हा वेळ गेला. मुळात थेट कारवाई करण्याचे अधिकारी बीयूटीआरला असताना लवकर कारवाई का झाली नाही, याबाबत अनेकांनी शंका उपस्थित केली होती. तसेच कारवाईसाठी दबाव वाढत असताना प्रशासनाकडून अनाकलनीय गुप्तता बाळगण्यात आली. मात्र, अलीकडेच कारवाई केल्याचे पत्र राज्यपालांना देण्यात आल्याचे स्पष्ट झाले असल्याने गाइडशिपच्या भ्रष्टाचारावर शिक्कामोर्तब झाले आहे.
तक्रार खरी असल्याचे झाले सिद्ध
विद्यापीठाने नेमके किती बोगस गाइड जाहीर केले याविषयी मला अद्याप लेखी माहिती मिळाली नाही. तरी वर्ष-सव्वा वर्षापूर्वी केलेली तक्रार खरी होती, हे आता सिद्ध झाले आहे. 60 पेक्षा जास्त बोगस गाइड माझ्या निरीक्षणात आले असले तरी त्यापेक्षा जास्त संख्या असू शकते. 13 व्यक्तींनी आरोप मान्य केले असून उर्वरित 10-15 व्यक्तींना कुठल्या आधारे पात्र समजले, हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. काहीतरी कारवाई झाली याचे मला समाधान आहे. संजय निंबाळकर, व्यवस्थापन परिषद सदस्य.

अपात्र मार्गदर्शकांची यादी
डॉ. डी. पी. डुंबरे मराठी
डॉ. एच. टी. माने मराठी
डॉ. एस. एच. सरकटे मराठी
डॉ. प्रमोद ए. देशमुख मेकॅनिकल
डॉ. प्रकाश कदम मेकॅनिकल
डॉ. सी.एल. गोगटे मेकॅनिकल
डॉ. स्वरूप आर. लाहोटी फार्मसी
डॉ. उल्हास बी. शिंदे इलेक्ट्रॉनिक्स
डॉ. अर्चना जी. ठोसर इलेक्ट्रिकल इंजि.
डॉ. प्रज्ञा डी. देशपांडे इंग्रजी
डॉ. एन.सी. देशमुख इंग्रजी
डॉ. नंदकुमार एस. राठी वाणिज्य
डॉ. एस.जे. भावसार वाणिज्य
डॉ. महावीर एन. सदावर्ते वाणिज्य
डॉ. एस.बी. चंदनशिवे वाणिज्य
डॉ. वाघमारे माणिक साधू वाणिज्य
डॉ. राजेश एस. शिंदे वाणिज्य
डॉ. विलास एस. इप्पर वाणिज्य
डॉ. राजेश बी. लहाने वाणिज्य
डॉ. किशोर एल. साळवे वाणिज्य
डॉ. एम.व्ही. पडूळ बायो केमेस्ट्री
डॉ. रेणुका डी. बडवणे समाजकार्य
डॉ. अशोक टी. गायकवाड संगणकशास्त्र
डॉ. एस. एस. सोनवणे ग्रंथालय माहितीशास्त्र
डॉ. नम्रता महेंद्रर कॉम्युटर सायन्स
डॉ. माधुरी एस. जोशी कॉम्युटर सायन्स