आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Babasaheb Ambedkar Marathwada University News In Marathi, Aurangabad

प्रभारी कुलगुरूंबाबत आज निर्णयाची शक्यता, विभागीय आयुक्तांकडे पदभार जाणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाच्या निवडीसाठी उशीर होण्याची चिन्हे असल्याने प्रभारी कुलगुरूंकडे पदभार सोपवला जाऊ शकतो, असे डॉ. सुधीर गव्हाणे यांनी म्हटले आहे. कुलगुरूपद प्रभारींकडे सोपवण्यासंबंधी अधिकृत सूचना मंगळवारी विद्यापीठाला मिळेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.


कुलगुरूपदासाठी 60 जणांचे अर्ज आल्याची माहिती राज्यपालांचे सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी दिली, तर कुलगुरूपदाच्या शर्यतीत काही नावे विद्यापीठातील असून जवळपास 40 नावे बाहेरील विद्यापीठांच्या कुलगुरूंची असल्याचे डॉ. गव्हाणे यांनी सांगितले. नव्या कुलगुरूंची निवड होईपर्यंत विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे पदभार देण्यात येईल, अशी चर्चाही आहे. मात्र निवडणूक कामाच्या व्यापामुळे त्यांनी नकार दिल्याचेही कळते. त्यामुळे नांदेड अथवा जळगाव विद्यापीठाच्या कुलगुरूंना प्रभारी निवडण्यात येईले. दुसरीकडे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक पी. आर. गायकवाड निवृत्त होत असल्याने त्यांच्या जागेवर कुलसचिव डॉ. डी. आर. माने यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.