आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.BAMU News In Marathi, Aurangabad, Divya Marathi , Student

विद्यापीठात भूमिगत वाहिनीला आग,विद्यार्थ्याचा हात भाजला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संगणकशास्त्र विभागाच्या शेजारील भूमिगत विद्युतवाहिनीला आग लागल्याने सोमवारी सायंकाळी कर्मचार्‍यांची चांगलीच तारांबळ उडाली. आग विझविताना एका विद्यार्थ्याचा हात भाजला. कर्मचार्‍यांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. विद्यापीठात एकूण 44 विभाग असून सर्वत्र भूमिगत विद्युतवाहिनी टाकण्यात आली आहे.
उन्हाळ्यामुळे तसेच सध्या परीक्षा सुरू असल्याने विजेची मागणी वाढली आहे. सायं. 6 वाजता संगणकशास्त्र विभागाच्या इमारतीच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेवर भूमिगत विद्युतप्रवाहाच्या फ्यूज बॉक्समधून धूर आला. जवळपासच्या गवताने पेट घेतला. बापू बोडखे आणि हनुमंत गिते या विद्यार्थ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. गिते यांनी संगणकशास्त्र विभागातील ‘फायर एक्सटिंग्विग्शर’ने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा हात भाजला. प्रभारी कुलसचिव डॉ. एस. टी. सांगळे यांनी भेट दिली.