औरंगाबाद - पीएचडीसाठी जातीच्या आधारावर आरक्षण दिले जाते. परंतु त्यासाठी लागणारे जात वैधता प्रमाणपत्र पीएचडी प्रवेशच्या सहा महिन्यांच्या आता जमा करणे आवश्यक आहे. परंतु हा नियम असतानाही पेट 2010 पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षा दिलेल्या आणि आरआरसी मान्यतेनंतर ज्यांनी प्रवेश घेतले त्यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रे सादर केलेली नाहीत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मोठ्या प्रमाणात संशोधनासाठी विद्यार्थी येत येतात. त्यात संशोधनासाठी संधी, गाइड मिळत नसल्याची ओरड विद्यार्थ्यांकडून होत असते. मात्र, गाइड मिळाल्यानंतर ज्या नियमांची पूर्तता करायला हवी ते नियम विद्यार्थी व विद्यापीठ पाळत नाही. 2010 मध्ये संशोधनास मान्यता मिळालेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही. यापूर्वी मराठी विभागात राजीव गांधी फेलोशिपमध्ये खोटे जात प्रमाणपत्र देऊन एका विद्यार्थ्याने शिष्यवृत्ती मिळवली होती. अशा घटनेनंतरही विद्यापीठ शहाणे झाले नाही.