आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Bamus Vc Election Issue At Aurangabad, Divya Marathi

कुलगुरुपदाचे सेमीफायनल आजपासून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरुपद कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. कुलगुरुपदाचे दावेदार असलेल्यांच्या मुलाखती व सादरीकरणाला 29 मेपासून सुरुवात होत आहे. 31 मे रोजी नव्या कुलगुरूंचे नाव घोषित होण्याची शक्यता आहे.
कुलगुरुपदासाठी जानेवारीत अर्ज मागवण्यात आले होते. 25 फेब्रुवारीपर्यंत जवळपास 70 ते 75 अर्ज आले. या अर्जांची छाननी करून अंतिम 20 जणांची यादी कुलगुरू शोध समितीने तयार केली असून वैयक्तिक मुलाखतींसाठी त्यांना बोलावले आहे. या उमेदवारांच्या मुलाखती 29 व 30 मेदरम्यान होणार आहेत. मुंबई येथे समितीसमोर सकाळी 9 वाजेपासून मुलाखती सुरू होतील. या समितीत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सी. के. ठक्कर यांच्यासह उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव संजयकुमार यांचा समावेश आहे. तसेच समन्वय अधिकारी म्हणून हिमाचल प्रदेशचे जैविक संपत्ती तंत्रज्ञान संस्थेचे प्रशासकीय अधिकारी परमजितसिंग आहुजा यांचाही समावेश आहे.

या मुलाखती 30 मे रोजी दुपारपर्यंत संपवण्यात येतील. त्यानंतर अंतिम पाच जणांची नावे राज्यपालांकाडे पाठवण्यात येतील. त्यातून 31 मे रोजी सायंकाळपर्यंत पाच जणांपैकी एकाचे नाव कुलगुरुपदासाठी जाहीर करतील.
हे आहेत स्पध्रेतील उमेदवार
डॉ. वि. ल. धारूरकर, डॉ. सुधीर गव्हाणे, डॉ.यशवंत खिल्लारे, डॉ.देवानंद शिंदे, बी. एस. वाघमारे, डॉ. एम. बी. मुळे, डॉ. विनायक भिसे आदी.