आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University News In Marathi, Divya Marathi

विद्यापीठ उभारणार केंद्रीय मूल्यांकन भवन : डॉ. चोपडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- परीक्षा भवनाचा विस्तार करून सर्व संलग्नित महाविद्यालयांचे पेपर तपासणीचे काम भवनामध्येच होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दिली. यासाठी चार कोटी रुपये लागणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत 392 महाविद्यालये आहेत. यात 164 अनुदानित महाविद्यालये आहेत. आवश्यक तेवढे मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे पेपर तपासणीचे काम इतर महाविद्यालयांना देण्यात येते. मात्र, आता गुणवत्ता टिकवण्यासाठी विद्यापीठाने केंद्रीय परीक्षा भवन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यात प्राध्यापकांची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. पेपर तपासण्यासाठी नियुक्त सर्वच प्राध्यापकांना ओळखपत्र तसेच थम्ब इम्प्रेशनद्वारे नोंद झाल्यानंतरच पेपर तपासण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे.