आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Balachandra Congo,Latest News In Divya Marathi

डॉ. भालचंद्र कांगो यांची ‘पूर्व’मधून तयारी सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- कामगार नेते डॉ. भालचंद्र कांगो पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून त्यांनी कामगार, डॉक्टर, साहित्यिक, कलावंत आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणा-या व्यक्तींच्या भेटीगाठींवर भर दिला आहे. कामगारांच्या आतापर्यंत पाच बैठका घेण्यात आल्या आहेत. या मतदारसंघातून काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू असतानाच भाकपच्या वतीने कांगो यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचे जाहीर केले. त्यामुळे या मतदारसंघाचे काहीशा प्रमाणात समीकरण बदलले आहे.
कांगो यांनी सर्व क्षेत्रातील मित्र आणि सहका-यांचा गोतावळा तयार केला आहे. त्यांच्या माध्यमातून कांगोचा प्रचार करण्यात येणार आहे. पथनाट्यातून मतदारांपर्यंत
डॉ. कांगो यांचे कार्य पोहोचवण्याचे काम केले जाणार आहे. तसेच सर्व कामगार संघटना एकवटल्या असून त्यांच्या बैठकींचे सत्र सुरू झाले आहे. आतापर्यंत पाच बैठका झाल्या आहेत. यामध्ये कंपनीतील कामगारांसह असंघटित कामगार आणि अंगणवाडी कर्मचा-यांचा समावेश आहे.
चिकलठाण्यात घरे उभारावीत
महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे शहरात समस्या वाढत आहेत. महापालिका सोयीसुविधा देण्यास अपयशी ठरली आहे. सिडकोत पाण्याची भीषण समस्या आहे. त्यांना हक्काचे पाणी मिळत नाही. चिकलठाणा एमआयडीसीमध्ये रिकाम्या जागा पडून आहेत. त्या ठिकाणी म्हाडाच्या माध्यमातून सामान्य लोकांना परवडतील अशा स्वरूपात घरे बांधावी, अशी भूमिका डॉ. कांगो यांनी मांडली.

जनतेवर कोणाची मक्तेदारी नाही
कांगो यांच्या उमेदवारीमुळे युतीच्या मतांचे विभाजन होणार याबाबत विचारले असता ते म्हणाले, जनता युती आणि आघाडी यात वाटली गेली आहे, असे आम्हाला वाटत नाही. त्यामुळे ती कुणाची मक्तेदारी नाही. युती आणि आघाडीवर जनतेचा रोष आहे. त्यामुळे कोणाला फायदा, तोटा होईल याचा विचार आम्ही करत नसल्याचे कांगो यांनी स्पष्ट केले.