आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठाचा "भूगोल' सापडेना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पाच वर्षांपूर्वी भूगोल विभाग सुरू झाला. मात्र आजही या विभागात भौतिक सुविधांची वानवा जाणवते. स्वतंत्र इमारत नसल्याने हा विभाग परकीय भाषा विभागातच सुरू आहे. विद्यापीठ परसिरात विभाग शोधायचा झाला तर तो सहजासहजी सापडत नाही.
भूगोल विषयाची व्याप्ती आणि महत्त्व ओळखता डॉ. नागनाथ कोत्तापल्ले कुलगुरू असताना म्हणजेच १४ ऑगस्ट २००९ रोजी हा विभाग सुरू झाला. वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर विभागाचा आढावा घेतला असता विद्यार्थी संख्या चांगली, मात्र सुविधा शून्य अशी परिस्थिती असल्याचे दसिले. सुरुवातीला सेवानिवृत्त प्रा. डॉ. केशव उके यांना समन्वयक म्हणून नेमण्यात आले. वर्षभरातच विभागात विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पण अद्याप स्वतंत्र इमारत नाही. सध्या येथे एकच नियमति प्राध्यापक आहे, तर चार शिक्षक हे तासिका तत्त्वावर शिकवतात. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, कोल्हापूर विद्यापीठानंतर औरंगाबाद विद्यापीठामध्ये भूगोल विषय शिकवला जातो. इतर शहरात भूशास्त्र नावाने विज्ञान शाखेत समाविष्ट करण्यात आला. तर मराठवाड्यात याला भूगोल असेच संबोधले जाते. भूगोल या विषयाचा ४० टक्के अभ्यासक्रम हा एमपीएससी आणि यूपीएससीमध्ये आहे. तर सामाजिक आणि पर्यावरण विकास आणि समृद्धीसाठी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे येथे सुविधा मिळणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश
पाच वर्षांत या विभागातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. आतापर्यंत सात विद्यार्थी नेट परीक्षा उत्तीर्ण झाले असून एका विद्यार्थ्यास जीआयएफची फेलोशिप, तीन विद्यार्थ्यांना राजीव गांधी फेलोशिप मंजूर झाली आहे. काही विद्यार्थ्यांना बंगळुरू येथील जीओ इन्फॉर्मेिटक्स अर्थात भूमाहतिीशास्त्र सॅटेलाइट सर्व्हेमध्ये नोकरी मिळाली आहे.
आपत्ती व्यवस्थापनावर होईल संशोधन
भूगोल विभागास स्वतंत्र इमारत, सुविधा मिळाल्यास आपत्ती व्यवस्थापन, हवामानातील बदल, सागर विज्ञान या विषयांवर संशोधन होण्यास मदत होईल. तसेच नव्या करिअरच्या संधी मिळू शकतील.
डॉ.मदनलाल सूर्यवंशी, भूगोल विभागप्रमुख.