आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.babasaheb Ambedkar Statue In Japan, Latest News In Marathi

कर्तृत्वाचा गौरव: जपानच्या बोधगयेत बाबासाहेबांचा पुतळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जपानची ‘बोधगया’ समजल्या जाणार्‍या वाकायामा प्रांतातील कोयासानमध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा उभारण्याची तयारी जपान सरकारने सुरू केली आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार केला असून पुतळा उभारणीच्या कामास लवकरच प्रारंभ होत आहे. बाबासाहेबांचा हा पुतळा जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रभावित होऊन जपान सरकारने हा निर्णय घेतला आहे. उभय देशांतील नागरिकांना सहजतेने ये-जा करता यावी आणि धार्मिक पर्यटनही करता यावे यासाठी जपान सरकारने पुढाकार घेतला आहे. जपान सरकारने बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी वाकायामा प्रांतातील कोयासानमध्ये मोठी जागा दिली असून भारतात तयार झालेला भव्य पुतळा तेथे उभारला जाणार आहे. त्यासाठी पन्नास लाख रुपयांची तरतूद केली आहे. राज्य सरकारने ही जबाबदारी महाराष्ट्र पर्यटन महामंडाळावर (एमटीडीसी) सोपवली असून एमटीडीसीच्या वरिष्ठ व्यवस्थापकांची एक टीम नुकतीच जपान दौरा करून आली आहे. टोकियोतील जपान पर्यटन मंडळाच्या कार्यालयात एमटीडीसीचे कार्यालय सुरू होऊन दोन महिने झाले आहेत. तेथे कामही सुरू झाले आहे. त्यामुळे भारतातील पर्यटकांना राहण्यासाठी हक्काची जागा मिळाली आहे, असे एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.जगदीश पाटील पाटील यांनी सांगितले.

२०१५ पर्यंत भव्य पुतळा : जपानमहाराष्ट्र सरकारच्या सामंजस्य करारानुसार हा पुतळा महाराष्ट्र सरकार तयार करून देणार असून जानेवारी २०१५ पर्यंत तो उभारण्याचा जपान सरकारचा मानस आहे.

जपानीधर्मगुरु संस्कृत बोलले: मुख्यमंत्रीपृथ्वीराज चौहान वाकायामा प्रांताचे राज्यपाल मिसाका यांच्यात २०१२ मध्येच हा सामंजस्य करार झाला .त्यानंतर एमटीडीसीच्या अधिकार्‍यासंह ऑगस्ट २०१३ मध्ये राज्यसरकारचे एक शिष्टमंडळ जपानला गेले होते.यात राज्याचे पर्यटनमंत्री भूजबळ, पर्यटन विभागाचे अतिरिक्त मुख्यसचिव, सुमित मलिक, मूळचे औरंगाबादचे सध्या मुंबईत एमटीडीसीत उपमहाव्यस्थापक पदावर असलेले चंद्रशेखर जैस्वाल हे होते. यावेळी जपानी धर्मगुरुंनी चक्क संस्कृमध्ये या शिष्टमंडाळाशी संवाद साधला. तर दुसर्‍यादा एमटीडीसाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.जगदीश पाटील सहव्यवस्थापकीय संचालक सतिष सोनी यांनी जपानला भेट दिली.राज्याचे पर्यटनमंत्री छगन भूजबळ यांनी जपानी राज्यपालांना स्लाईड शोव्दारे महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची माहिती सांगितली.

जपानी भिक्खूंसाठी बुद्धविहार
जपानीबौद्ध भिक्खूंना जगप्रसिद्ध अजिंठा-वेरुळ लेणींचा अभ्यास करणे सोयीचे जावे म्हणून जपान औरंगाबादेत भिक्खूंसाठी बुद्धविहार (मॉनेस्ट्री) उभारणार आहे.

धम्मभूमी कोयासान
कोसायानही जपानमधील प्राचीन धम्मभूमी असून ितला बोधगयेसारखेच महत्व आहे. येथे सर्व धर्मांचा अभ्यास केला जातो. तेथे संस्कृतचे अभ्यासकही आहेत. येथेच बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात येत आहे.
पाच महिन्यात पुतळा
जपाननेबाबासाहेबांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला ही भारतीयांसाठी गौरवाची बाब आहे. यासाठी 5 महिने लागतील. सतीश सोनी, सहव्यवस्थापकीय संचालक, एमटीडीसी, मुंबई