आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. B­­.A.M.University,latest News In Divya Marathi

विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना खुले झाले युरोपचे द्वार, प्राध्यापक, विद्यार्थ्यांना नऊ युरोपियन देशात संशोधनाची संधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांना आता थेट युरोपियन खंडाच्या नऊ देशातील विद्यापीठात जाण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. 9 व 10 ऑक्टोबर रोजी युरोपीय शिक्षण तज्ज्ञांचे पथक औरंगाबादेत येऊन संशोधन करारावर स्वाक्षऱ्या करणार आहेत. अशा प्रकारचा करार करणारे येथील विद्यापीठ राज्यातील पहिले विद्यापीठ ठरले आहे.

कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतरचे हे सर्वात महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. नॅककडून अ दर्जा मिळाल्यानंतर अशा प्रकारचा करार म्हणेजच विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा असल्याचे कुलगुरु डॉ. चोपडे यांनी सांगितले. युरोपातील तज्ज्ञांची एक समिती 9 आणि 10 ऑक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात येणार आहे. यात डॉ. प्राध्यापक कार्लस मक्याडो- बेल्झियम, प्रा. मारिया ल्यामेला- स्पेन, प्रा. हॅन्सी फ्लॉरेझो- इटली, प्रा. मॉन्सी जोसेफ- पोलंड यांचा समावेश असलेले शिष्टमंडळ औरंगाबादेत दोन दिवस मुक्कामी असेल.या युरोपातील पथकाचे सदस्य विद्यापीठाच्या सर्व विभागांची पाहणी केल्यानंतर सामंजस्य करारावर स्वाक्ष-या करणार आहेत.
कुलगुरू जाणार युरोपला
करारानंतर कुलगुरू चोपडे व कुलसचिव डॉ. डी. आर. माने, बीसीयूडी संचालक डॉ. के. व्ही . काळे हे 8 ते 16 नोव्हेंबरदरम्यान युरोपीय खंडातील विद्यापीठास भेटी देणार आहेत. या वेळी ते शंभर कोटी रुपयांचे शैक्षणिक प्रस्ताव त्या विद्यापीठांना सादर करणार आहेत.
कराराचा विद्यार्थी व प्राध्यापकांना फायदा
हा करार केल्यामुळे विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी व प्राध्यापकांना सहजपणे युरोप खंडातील विद्यापीठात ये-जा करता येईल. विद्यार्थी संशोधन करतील तर प्राध्यापक तेथे जाऊन शिकवतील. तसेच या खंडातील ज्ञान संपन्न प्राध्यापक आपल्या विद्यापीठात येऊन शिकवतील. यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरचे ज्ञान सहज उपलब्ध होणार असल्याची माहिती मंगळवारी कुलगुरू डॉ. चोपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.