औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विदेशी विद्यार्थ्यांना सापत्न वागणूक मिळत असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. काही विदेशी विद्यार्थ्यांनी ही भावना व्यक्त केल्याने कुलगुरूंनी याविषयी तत्काळ दखल घेत तातडीची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विदेशी विद्यार्थ्यांसाठी लवकरच अद्ययावत नवीन वसतिगृह बांधण्याच्या कामालाही त्यांनी मंजुरी दिली आहे.
विद्यापीठात ऐंशीच्या दशकापासून विदेशी विद्यार्थ्यांचा ओघ सुरू झाला. यात केनिया, आखाती व आफ्रिकेतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दरवर्षी सुमारे ४०० विद्यार्थी विदेशातून विद्यापीठात शिक्षणासाठी येतात. यात वृत्तपत्रविद्या अभ्यासक्रमासह पर्यावरणशास्त्र व बेसिक सायन्सचा अभ्यास तसेच भारतीय भाषा यात संस्कृत, उर्दू, पाली या भाषा अवगत करण्यातही त्यांना विशेष रस असतो. यंदाही सुमारे ४०० विदेशी विद्यार्थी विद्यापीठात आहेत.
वसतिगृह नसणे मोठी अडचण
विदेशी विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठात स्वतंत्र वसतिगृह नाही. गेल्या तीस वर्षांत तसा महत्त्वाचा निर्णयदेखील घेण्याची तसदी विद्यापीठाने घेतली नाही. कुलगुरूंनी नुकताच युरोपीय खंडातील नऊ विद्यापीठांशी करार केला आहे. त्या पार्श्वभूमीवर विदेशी विद्यार्थ्यांची नाराजी महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे एका वर्षात नवीन वसतिगृह तयार करण्याचा निर्णय कुलगुरूंनी घेतला आहे.