आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठाच्या अधिका-यांसाठी आलिशान महागड्या गाड्या, विद्यार्थी संघटनांनी व्यक्त केली नाराजी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने 31 लाख रुपये खर्च करून अधिका-यांसाठी फोक्सवॅगनच्या दोन नवीन कारची खरेदी केली आहे. कुलसचिव डॉ. धनराज माने, बीसीयूडीचे संचालक डॉ. कारभारी काळे या दोन अधिका-यांसाठी या दोन नवीन कार खरेदी करण्यात आल्या आहेत. एकीकडे कुलगुरू बचत अभियानातुन सुरक्षा रक्षक, कर्मचारी कमी करत असताना दुसरीकडे पैशांचा असा वापर होत असल्याने विद्यार्थी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. विद्यापीठातील वसतिगृहात स्वच्छ पाणी नाही, ग्रंथालय, भूगोल, नॅनो टेक्नॉलॉजी या विभागांना स्वतंत्र जागा नाही. असे असताना विद्यापीठाने महागड्या गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला. सुविधांचा अभाव असल्याने अनेक विभागांत विद्यार्थी संख्या कमी होत आहे. एवढेच नाही तर मानसशास्त्र, वृत्तपत्रविद्या विभाग, इतिहास विभागात तासिका तत्त्वावर वर्ग सुरू आहेत. काही विभागांची मदार एक-दोन शिक्षकांवरच असल्याचा आरोपही संघटना करत आहेत.
गाड्यांनी साधली हॅट्ट्रिक
माजी कुलगुरू डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांच्या कार्यकाळात लाखो रुपये खर्च करून स्कोडा गाडी खरेदी करण्यात आली होती. त्यानंतर डॉ. विजय पांढरीपांडे यांच्या कार्यकाळात 22 लाख रुपये खर्च करून फॉर्च्युनर गाडी घेण्यात आली. आता डॉ. बी. ए.चोपडे यांच्या कार्यकाळात फोक्सवॅगनच्या कार खरेदी करण्यात आल्या आहेत.