औरंगाबाद- बहुचर्चित पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षेत (पेट) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र लवकरच वितरित केली जातील, अशी माहिती यांनी दिली. प्रमाणपत्र वितरणास आरक्षणाची वर्गवारी करण्यामुळे विलंब झाल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने पेट -3 ची परीक्षा 28 सप्टेंबर रोजी घेतली. या परीक्षेचा निकाल दहा दिवसांत लावण्याचा दावा विद्यापीठ प्रशासनाने केला होता. मात्र तांत्रिक अडचणींमुळे दोन दिवस उशिरा ऑनलाइन जाहीर करण्यात आला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पीएचडी केव्हाही करा, परत पेट देण्याची गरज नाही, असे घोषित करून उत्तीर्णतेचा पुरावा म्हणून प्रमाणपत्र देण्याची घोषणा विद्यापीठाने केली. त्यातही िनकाल लागून महिना झाला तरी उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना मिळाले नव्हते. पेट परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू झाली तेव्हा मराठा आणि अल्पसंख्याक आरक्षण लागू करण्यात आले नव्हते. त्यानंतर ते लागू करण्यात आले. यामुळे परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांनी त्यावेळी अर्ज भरतानाही कास्ट कॅटेगरी पूर्वीप्रमाणे टाकली. त्यामुळे अर्जांची छाननी तसेच आरक्षित अर्ज बाजूला करून अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्या कारणामुळेच प्रमाणपत्र देण्यास विलंब लागल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले.
लवकरच प्रमाणपत्रे देऊ
पेट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना दोन, चार दिवसांतच प्रमाणपत्रे वितरित केले जातील. या प्रमाणपत्रांवर विद्यार्थ्याचे नाव, मिळालेले गुण आणि कास्ट कॅटेगिरीही असणार आहे. लवकरच उपलब्ध असलेल्या संशोधक मार्गदर्शक आणि त्यांच्याकडे असलेल्या रिक्त जागांची यादीही ऑनलाइन देण्यात येईल. त्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. डॉ. के. व्ही. काळे, बीसीयूडी संचालक