आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ-औद्योगिक जगतात संशोधनासाठी होणार संवाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि औद्योगिक जगतात संशोधन प्रकल्पांसाठी संवाद होणार आहे. त्याकरिता विशेष अधिका-याच्या अधिपत्याखाली स्वतंत्र विभाग सुरू करण्याचा निर्णय शुक्रवारी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत झाला. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, संशोधनाला लागणारा निधी यातून मिळू शकेल. मुद्रणालय विभाग सक्षम करणे, एमफिल अभ्यासक्रमाचा कालावधी किती असावा, हे ठरवण्यासाठी समिती स्थापन होणार आहे. बॅँकिंग आणि फायनान्स सेक्टरमध्ये निर्माण होणाऱ्या संधी पाहता विद्यापीठाच्या वाणिज्य विभागात 2015-16 या शैक्षणिक वर्षापासून ई-कॉमर्स या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासाठी महाविद्यालयांचे प्रस्ताव मे 2015 पर्यंत स्वीकारले जातील, असे कुलसचिव डॉ. धनराज माने यांनी सांगितले. 16 ते 21 नोव्हेंबर दरम्यान कुलगुरू, बीसीयूडी संचालक युरोप दौ-यावर जाणार आहेत. तेथे ते प्रमुख 20 विद्यापीठांशी सामंजस्य करार करणार आहेत. आजच्या बैठकीत संशोधनात एकसूत्रता आणणारा आराखडा मंजूर करण्यात आला.
30 नोव्हेंबरपर्यंत सुट्या
विद्यापीठात 16 ते 30 नोव्हेंबरपर्यंत क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.त्यामुळे विद्यापीठांतर्गत पदव्युत्तर डिसेंबरमध्ये होतील. तसेच महोत्सवाच्या काळात विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली आहे. पेट उत्तीर्णतेच्या प्रमाणपत्रावर जातीचा उल्लेख करू नये, असाही निर्णय झाल्याचे बीसीयूडीचे संचालक डॉ.के.व्ही.काळे यांनी सांगितले. विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी, क्रीडा महोत्सवासाठी प्रख्यात धावपटू मिल्खा सिंग यांना निमंत्रित करण्यात आले आहे.