आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Ravindra Suryawanshi Receive Post Doctoral Fellowship

डॉ. रवींद्र सूर्यवंशी यांना फेलोशिप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विद्यापीठाच्या जनसंवाद वृत्तपत्रविद्या विभागाचे अभ्यागत अधिव्याख्याता डॉ. रवींद्र सूर्यवंशी यांना पोस्ट डॉक्टरेट रिसर्च फेलोशिप जाहीर करण्यात आली आहे. नवी दिल्ली येथील इंडियन कौन्सिल फॉर सोशल सायन्स रिसर्च यांच्यामार्फत फेलोशिप जाहीर करण्यात आली आहे. ‘फॅसेट्स ऑफ निओ जर्नालिझम इन अर्बन सोसायटी; चेंजिंग ट्रेंड्स इन सिव्हिक रिपोर्टिंग इन इमर्जिंग मेट्रोज इन मराठी प्रेस ऑफ औरंगाबाद अँड नाशिक’ या विषयावर ते दोन वर्षे विभागातच संशोधन करणार आहेत. याबद्दल डॉ. सुधीर गव्हाणे, प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर, प्रा. जयदेव डोळे, डॉ. दिनकर माने, संजय पाईकराव आदींनी अभिनंदन केले .