आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बामूच्‍या विद्यार्थ्यांनी अभ्यासले विधिमंडळाचे कामकाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राज्यशास्त्र व लोकप्रशासनाच्या विद्यार्थ्यांनी विधिमंडळ, संसदीय कार्यप्रणालीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. दोन्ही विभागांच्या प्रत्येकी ३ विद्यार्थ्यांनी ४४व्या संसदीय अभ्यासवर्ग व कार्यप्रणाली कार्यशाळेत सहभाग नोंदवला.
विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानाऐवजी संसदीय कार्यप्रणाली, विधिमंडळ, अधिवेशन आदींचा अनुभव यावा या उद्देशाने राज्यातील ११ विद्यापीठांतील राज्यशास्त्र व लोकप्रशासनाच्या विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संभाजी तांबे, सुवर्णा सोनवणे, राजरत्न गवई, नचिकेत हंमणे, महेश थळपदे व दीपक पगारे यांच्या संघाने प्रा. प्रशांत अमृतकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यशाळेत सहभाग घेतला. पाच दिवसांच्या काळात विद्यार्थ्यांनी विधान परिषदेच्या विविध विभाग , सचिवालय, ग्रंथालय तसेच आमदारांच्या भेटी घेतल्या. अभ्यास दौऱ्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवास भत्त्यासह मानधनही देण्यात आले.

मुख्यमंत्र्यांचे विद्यार्थ्यांना आवाहन : संसदीय लोकशाही व कार्यप्रणालीवर विद्यार्थ्यांना विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी, वीज व पैशांची बचत करण्याबरोबच स्वच्छता राखण्याचे आवाहन केले. यानंतर सुधीर मुनगंटीवार, रवींद्र वायकर, गिरीश बापट, सुभाष देसाई, राधाकृृष्ण विखे पाटील, दिलीप वळसे पाटील, अजित पवार, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.