आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Gaikwad Elected Of Registrar Oj Dr.BAMU Aurangabad

मानेंना निरोप, गायकवाडांचे स्वागत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिवपदाचा कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांनी मंगळवारी (६ जानेवारी) सकाळी मावळते कुलसचिव डॉ. धनराज माने यांच्याकडून पदभार स्वीकारला. डॉ. धनराज माने यांची उच्चशिक्षण संचालकपदी निवड झाल्याने हे पद रिक्त झाल्यानंतर कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी त्यांची नियुक्ती केली.

डॉ. गायकवाड हे रसायनशास्त्र विभागात प्राध्यापक असून ८ ऑगस्ट २०१४ पासून ते परीक्षा नियंत्रक म्हणूनही काम बघत होते. बलभीम महाविद्यालयासह विविध महाविद्यालयांत त्यांनी २५ वर्षे अध्यापनाचे काम केले आहे. पदव्युत्तर विभाग प्राध्यापकांच्या "बामुटा' संघटनेचेही ते अध्यक्ष आहेत. पारदर्शकता, गतिमानता व आयसीटी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. शिवाजी मदन, डॉ. देवानंद शिंदे, डॉ. अशोक मोहेकर, डॉ. एस. एस. शेख, डॉ. विलास खंदारे, डॉ. किशन धाबे, डॉ. अरुण खरात, डॉ. चेतना सोनकांबळे, उपकुलसचिव दिलीप भरड आदींची उपस्थिती होती.

यशस्वी कुलसचिव ठरलो - डॉ. माने
सर्व अधिकार मंडळांचे सदस्य, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याने तीन वर्षे यशस्वी कुलसचिव म्हणून काम करू शकलो. यापुढे शिक्षण संचालक म्हणून कामाचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न करणार असल्याचा मानस डॉ. धनराज माने यांनी व्यक्त केला.