आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. BAMU Team Win In Nss State Level Competition

‘उत्कर्ष’मध्ये यजमान कलावंतांचीच बाजी, औरंगाबादला उत्कृष्ट संघाचे विशेष पारितोषिक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्या राज्यस्तरीय सामाजिक, सांस्कृतिक ‘उत्कर्ष’ महोत्सवाचा गुरुवारी रंगतदार समारोप करण्यात आला. यजमान विद्यापीठ संघाने डझनभर पारितोषिकांसह उत्कृष्ट संघाचे विशेष पारितोषिकही खिशात घातले. त्यामुळे विद्यापीठ संघाने दुपारी ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला.

सुमारे ४५० कलावंतांनी या महोत्सवात सहभाग घेतला. सर्वाधिक बक्षिसांची लयलूट यजमान संघाने केली. त्यामध्ये संकल्पना नृत्य (दुसरे), पथनाट्य- (द्वितीय), भारतीय लोकवाद्य (द्वितीय), भारतीय लोककला, पोवाडा-भजन (प्रथम), भित्तिचित्रे (प्रथम- श्वेता सुरेश शिंदे), वक्तृत्व (प्रथम-नीलेश चव्हाण), ललित कला पथसंचलन (द्वितीय), संगीत विभाग, उत्कृष्ट भित्तिचित्रांच्या स्पर्धेत विजेतेपदही याच संघाने मिळवले, तर उत्कृष्ट स्वयंसेवकाचे पारितोषिक शरद काकडे याने पटकावले. नाटककार राजकुमार तांगडे, पाटोद्याचे सरपंच भास्कर पेरे, व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या प्रतिभा पाटील यांच्या हस्ते बक्षिसे वितरित करण्यात आली. संयोजक डॉ. राजेश करपे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. चेतना सोनकांबळे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. अतुल साळुंके अध्यक्षस्थानी होते. प्रास्ताविक डॉ. करपे यांनी केले, तर बक्षिसांची घोषणा जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांनी केली. उत्कृष्ट संघाचे प्रशिक्षक डॉ. अशोक बंडगर, डॉ. हंसराज जाधव, डॉ. समाधान इंगळे, प्रा. अर्जुन मोरे आदींचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. हंसराज जाधव यांनी केले, तर संदीप पाटील यांनी आभार मानले.