आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे आर. के. लक्ष्मण यांना श्रद्धांजली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत मार्मिक व्यंगचित्र रेखाटून आर. के. लक्ष्मण यांनी राजकीय, सामाजिक दांभिकतेवर परखड भाष्य केले. वैश्विक प्रतिभेच्या कलात्मक व्यंगचित्रकाराला आपण मुकलो आहोत, अशा शोकसंवेदना श्रद्धांजली सभेत व्यक्त करण्यात आल्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे मंगळवारी शोकसभा घेण्यात आली. मान्यवरांनी आर.के. लक्ष्मण यांना श्रद्धांजली अर्पण केली. सभेला कुलगुरु डॉ. बी. ए. चोपडे, बीसीयूडीचे संचालक डॉ. के. व्ही. काळे, परीक्षा नियंत्रक डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. सय्यद अझरुद्दीन, डॉ. शिवाजी मदन, डॉ. कल्याण लघाने, डॉ. सर्जेराव ठोंबरे, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, प्रा. गजानन सानप, डॉ. चेतना सोनकांबळे उपस्थित होत्या. कुलगुरू म्हणाले, कॉमन मॅनला अजरामर करून आर. के. लक्ष्मण यांनी आयुष्यभर आपली प्रतिभा लोकाच्या प्रश्नांसाठी अर्पण केली. अशा प्रतिभावान माणसांमुळे देश मोठा होत असतो. वृत्तपत्र आणि जनसंवाद विभागाचे विभागप्रमुख डॉ. सुधीर गव्हाणे म्हणाले, व्यंगचित्रकारितेच्या माध्यमातून आर. के. लक्ष्मण यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक दांभिकतेवर परखड भाष्य केले. विद्यापीठाने १२ जानेवारी १९७९ रोजी लक्ष्मण यांना डी.लिटने सन्मानित केले. तत्कालिन राज्यपाल सादिक अली कुलगुरु डॉ. बी. आर. भोसले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला असल्याचे या वेळी सांगण्यात आले. डॉ. िव.ल. धारूरकर यांनीही मत मांडले. संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.