आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Pralhad Lulekar Book Publication Issue At Aurangabad

डॉ. लुलेकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठीचे प्राध्यापक डॉ. प्रल्हाद लुलेकर यांच्या ‘साठोत्तरी साहित्यप्रवाह भाग-१ आणि २’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रख्यात भाषातज्ज्ञ पद्मश्री डॉ. गणेश देवी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. रविवारी सायंकाळी ७ वाजता एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात हा सोहळा होणार असून डॉ. सूर्यनारायण रणसुभे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. प्रसिद्ध नाटककार, समीक्षक प्रा. दत्ता भगत यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहील. तर डॉ. रामचंद्र काळुंखे हे पुस्तकावर भाष्य करणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन नितीन कोत्तापल्ल यांनी केले आहे.