आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. सरवदेंकडून कॅप्टन तिसऱ्यांदा बाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- दोन व्यक्तींच्या संदर्भात विविध घटनांमध्ये तथा कार्यपद्धतीत कधी-कधी विलक्षण योगायोग जुळून येतो. असाच योगायोग विद्यापीठातील प्रा. डॉ. वाल्मीक सरवदे आणि कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड या दोन प्राध्यापकांमध्ये जुळून येताना दिसतोय. संगीत खुर्चीच्या खेळाप्रमाणे कॅ. गायकवाड यांनी भूषवलेल्या पदांवर कार्यकाळ संपताच डॉ. सरवदे यांनी बाजी मारली आहे. संगीत खुर्चीमध्ये कॅप्टनला तिसऱ्यांदा बाद करून डॉ. सरवदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशनचे म्हणजेच बामुटाच्या अध्यक्षपदाची खुर्ची पटकावली आहे. या दोन जिवलग मित्रांच्या संगीत खुर्चीचा तपशील असा...
उर्वरित कार्यकारिणी अशी...
वार्षिक निवडणुकीसाठी दाखल अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवारचा अखेरचा दिवस होता. पाचपैकी चार जागांसाठी प्रत्येकी एकच अर्ज सादर झाल्यामुळे चार जागांवर बिनविरोध निवड झाली आहे. सचिवपदी डॉ.रत्नदीप देशमुख यांचीही बिनविरोध निवड झाली. डॉ.देशमुख यांनी अधिसभा, व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून काम पाहिले आहे. मराठी विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. रमेश जाधव यांची उपाध्यक्षपदी तर कोशाध्यक्षपदी प्राणिशास्त्राचे डॉ. भालचंद्र वायकर यांची निवड झाली. सहसचिवपदासाठी मात्र संख्याशास्त्राचे डॉ.सुनील कावळे उस्मानाबाद येथील रसायनशास्त्राचे डॉ. एम. के. पाटील दोघांपैकी एकानेही अर्ज मागे घेतल्यामुळे. या पदासाठी जुलै रोजी मतदान घेतले जाणार आहे. डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. माधव सोनटक्के डॉ.व्ही.एच. बजाज यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
विद्यापीठात बड्या पदांसाठी स्पर्धा
कॅप्टन डॉ. गायकवाड यांनी विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक म्हणून (डीएसडब्ल्यू) २०११ पर्यंत दोन वर्षे काम पाहिले. त्यानंतर तत्कालीन कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी डॉ. सरवदे यांना डीएसडब्ल्यू म्हणून २८ जून २०११ रोजी नेमल्यामुळे त्यांनी नियुक्तीच्या दिवशीच पदभार घेतला. त्यानंतर विद्यमान कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी ऑगस्टला कॅप्टन यांना परीक्षा नियंत्रक केले. १५ जानेवारीपर्यंत त्यांनी काम पाहिले. मात्र, कॅप्टनकडील अचानक पदभार काढून कुलगुरूंनी १५ जानेवारीलाच डॉ. सरवदे यांना कार्यभार घेण्यास सांगितले.
बातम्या आणखी आहेत...