आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कुलसचिवपदाच्या मुलाखती २२ जुलैला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कुलसचिवपदासाठी २२ जुलै रोजी लेखी परीक्षा होणार आहे. त्यासंबंधी उमेदवारांना सूचना पाठवण्यात आल्या आहेत. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिवपद सात महिन्यांपासून रिक्त आहे. सध्या या पदाचा कारभार प्रभारी स्वरुपात सुरू आहे. आतापर्यंत तीन वेळा या पदावर प्रभारी अधिकाऱ्यांची नेमणूक झाली आहे. या पदावर येण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत, परंतु सुरुवातीला जाहिरात काढूनही योग्य उमेदवार न मिळाल्याने मुलाखती रद्द करण्यात आल्या होत्या. गेल्या महिन्यात मुलाखतींची पुन्हा जाहिरात देऊन अर्ज मागवण्यात आले होते, परंतु कुलगुरूंच्या स्पर्धेमध्ये असलेले असोसिएट प्रोफेसर आम्ही परीक्षा देणार नाही, असा पवित्रा घेतला होता. या परीक्षेसाठी २१ उमेदवारांना कॉल लेटर पाठवण्यात आले आहेत.