आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहि:शाल मंडळातर्फे वर्षभर उपक्रम; आठ लाखांचा निधी मंजूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळातर्फे विद्यार्थी शेतकऱ्यांसाठी वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ३६ महाविद्यालयांत शेतकरी आत्महत्यांसह १२ प्रकारचे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. त्यासाठी लाख २० हजार रुपयांची तरतूद केल्याची माहिती संचालक डॉ. कैलास पाथ्रीकर यांनी शुक्रवारी दिली.

बहि:शाल शिक्षण मंडळातर्फे ग्रामीण तथा शहरी भागातील नागरिक, शेतकरी, महिला, विद्यार्थी, शिक्षक आदी घटकांसाठी त्यांच्या जाणिवा विकसित करण्याच्या दृष्टीने प्रबोधनात्मक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. वर्ष २०१५-१६ करिता कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्यासाठी लाख २० हजार रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी या वर्षीचे जास्तीत जास्त कार्यक्रम ग्रामीण भागात राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मंजूर केलेल्या लेखानुदानातून व्यक्तिमत्त्व विकास शिबिर, पाणंदमुक्त गाव संकल्पना, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगारविषयक प्रशिक्षण, शेतीमाती परीक्षण, महिला सक्षमीकरण, भूजल व्यवस्थापन, पंचायतराज प्रशिक्षण, आरोग्य शिबिर, शेतकऱ्यांच्या आत्महत्याविषयक जाणीव जागृती, यशवंतराव चव्हाण यांची ग्रामीण विकासाची संकल्पना, मतदान जागृती, कॉपीमुक्त परीक्षा अभियान आदी उपक्रम राबवायचे आहेत. यासाठी चार जिल्ह्यांतून ३६ महाविद्यालयांची निवड झाली असून प्रत्येकी २० ते ३० हजार अनुदान देण्यात येणार असल्याचे डॉ. पाथ्रीकर यांनी सांगितले.

दुष्काळी परिस्थितीवर चर्चासत्र घेणार
मराठवाड्यात गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर या वर्षी शेतकरी आत्महत्या परिसंवाद, भूजल व्यवस्थापन, यशंवतराव चव्हाण यांची ग्राम विकासाची संकल्पना आदी विषयांवर चर्चासत्र घेण्यात येणार आहेत, असे डॉ. पाथ्रीकर यांनी सांगितले. कुलगुरू हे स्वत: प्रत्येक जिल्ह्यातील किमान दोन-तीन कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. कृषितज्ज्ञ विजयअण्णा बोराडे, बी. बी. ठोंबरे, अमर हबीब, प्राचार्य मधुकर गायकवाड, आसाराम लोमटे, विजय जावंधिया, चंद्रकांत वानखेडे, प्राचार्य सर्जेराव ठोंबरे, डॉ. सुधीर गव्हाणे, डॉ. वि. ल. धारूरकर, बाळासाहेब सराटे आदींचे मार्गदर्शन आयोजित केले आहे.