आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता कुलसचिव नेमणे अपरिहार्य, कुलगुरूंसमोर पर्याय कमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिवपदासाठी १४ जणांनी प्रत्यक्षात अर्ज सादर केले आहेत. पहिल्यांदा अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. गतवेळी अर्ज केलेल्यांपैकी चर्चेतील चेहरे डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. प्रदीप जब्दे आणि ईश्वरसिंग मंझा यांनी पुन्हा अर्ज करून चुरस वाढवली आहे. कुलसचिव नेमणुकीच्या प्रक्रियेमुळे कायम टीकेचे धनी ठरलेल्या कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना या वेळी मात्र निवड करणे अपरिहार्य बनल्याची स्थिती आहे.

जानेवारी २०१४ पासून रिक्त असलेल्या कुलसचिवपदासाठी तीन वेळा मुलाखतीचे ‘शेड्यूल’ लागले होते. लेखी परीक्षेनंतर मुलाखत घेण्याच्या कुलगुरूंच्या आग्रहामुळे कुलसचिवपदाची निवड प्रक्रिया वादात सापडली. शिवाय तात्पुरता प्रभार देण्यावरूनही कुलगुरूंनी तीन वेळा वाद ओढवून घेतल्याचे सर्वश्रुत आहे. या वेळी नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन, तर १० नोव्हेंबरपर्यंत ऑफलाइन अर्जाची मुदत होती. १० नोव्हेंबरपर्यंत एकूण १४ जणांनी अर्जाची प्रत विद्यापीठात जमा केली. टपालाने स्थळ प्रत जमा करणाऱ्यांमध्ये दोघांचे अर्ज वाढण्याची शक्यता आहे. नव्याने अर्ज करणाऱ्यांमध्ये डॉ. एस. व्ही. मगरे, डॉ. सी.एम. सेडाणी, डॉ. ए. ए. काकडे, डॉ. ए. एस. बिराजदार, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. पी. बी. भराटे, डॉ. एस. व्ही. बहिरराव, वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद उबाळे, डॉ. डी. एल. चव्हाण आणि डॉ. आर. एम. चव्हाण आदींचा समावेश आहे. दुसऱ्यांदा अर्ज करणाऱ्यांमध्ये वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉ. वाल्मीक सरवदे, मशिप्रचे प्राचार्य डॉ. प्रदीब जब्दे, उपकुलसचिव ईश्वरसिंग मंझा आणि डॉ. शंकर अंभोरे यांचा समावेश आहे. यंदाच्या प्रक्रियेत पुन्हा डॉ. सरवदे आणि डॉ. प्रदीप जब्दे यांच्यामध्ये चुरस राहण्याची शक्यता आहे.

०३ वेळामुलाखतीचे ‘शेड्यूल’
०६ नोव्हे.ऑनलाइनची होती मुदत
१४ जणांकडूनअर्जाची प्रत जमा
१० नोव्हें.ऑफलाइनची होती मुदत

..अन्यथा अडचणी वाढतील
तात्पुरताकार्यभार देणे किंवा निवड प्रक्रियेतील कुलगुरूंच्या भूमिकेमुळे कुलसचिवपदासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या या वेळी रोडावली आहे. वर्षभराची व्हॅलिडिटी असलेली ‘रोलिंग’ जाहिरात असली तरी या वेळी उमेदवार लायक नसल्याचा मुद्दा निवड समितीने पुन्हा वापरला तर कुलगुरूंची नाचक्की होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना प्राप्त उमेदवारांमधूनच कुलसचिवांची निवड करणे अपरिहार्य बनले आहे. अन्यथा त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाण्याची दाट शक्यता आहे.

अशी आहे मागील पार्श्वभूमी
कुलसचिवपदासाठीआधीच्या प्रक्रियेत २७ अर्ज आले होते. त्यापैकी १० जून रोजी मुलाखतीसाठी २१ जणांना पात्र ठरवले गेले. प्रत्यक्षात मात्र १८ जणांनीच हजेरी लावली. परंतु लेखी परीक्षेच्या वादामुळे २५ जूनपर्यंत परीक्षा पुढे ढकलली. २५ नंतर पुन्हा २२ जुलैला कुलगुरूंनी लेखी परीक्षा घेऊन मुलाखती घेतल्या. या परीक्षेत पुन्हा अर्ध्यापेक्षा अधिक उमेदवार गैरहजर राहिले. फक्त नऊ जणांनी दिलेल्या लेखी परीक्षेत एकही जणाचा ‘परफॉर्मन्स’ चांगला नसल्याचा मुद्दा उपस्थित करत निवड समितीने मुलाखती रद्द केल्या