आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाॅ. नाईकवाडे निलंबित, |रेणुच्या पिलांच्या मृत्यूवरून सर्वसाधारण सभेने केली कारभाराची चिरफाड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रेणू तिच्या पिलांची देखभाल करण्यात निष्काळजीपणा केल्याने तीन पिलांचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवत आज मनपाच्या सर्वसाधारण सभेने प्राणिसंग्रहालयाचे संचालक डाॅ. बी. एस. नाईकवाडे यांना निलंबित करण्याचा एकमताने निर्णय घेतला. तीन तासांच्या घमासान चर्चेत सर्वपक्षीय सदस्यांनी डाॅ. नाईकवाडे यांच्या कारभाराचे वाभाडे काढले. एवढे होऊनही डाॅ. नाईकवाडे यांनी आपण या प्रकरणात निर्दोष असल्याचे सांगत मीडियात फक्त एकच बाजू आल्याचे सांगत सभागृहाने मला शिक्षा देण्याचेच ठरवले असल्याचे वर म्हटले.

गेल्या महिन्यात हेमलकसा येथून प्रकाश आमटे यांच्या प्राणिसंग्रहालयातून औरंगाबादेत आणलेल्या बिबट्यांच्या जोडीपैकी रेणुने अचानक तीन पिलांना जन्म दिला ३६ तासांत अन्न पाण्याविना ही पिले मरण पावली. या हळहळ निर्माण करणाऱ्या घटनेमागे प्राणिसंग्रहालय प्रशासनाचा निष्काळजीपणा असल्याचे समोर आले होते. साऱ्या शहरभर प्राणिसंग्रहालयाचे संचालक डाॅ. बी.एस. नाईकवाडे यांच्याबद्दल संतापाचे वातावरण होते. आज मनपाच्या सर्वसाधारण सभेत त्याचे पडसाद पाहायला मिळाले. दुपारी तीन वाजता सुरू झालेल्या सभेत हा विषय चर्चेला आला सहा वाजेपर्यंत त्यावर गरमागरम चर्चा झाली. नाईकवाडे डाॅक्टर आहेत की नाही अशी शंकाच राजू वैद्य यांनी उपस्थित केली येथील प्राणी त्यांच्या भरवशावर ठेवता येणार नाहीत. म्हणून प्राणिसंग्रहालयातील वन्य प्राण्यांची देखभाल करण्यासाठी वन्यप्राण्यांचे तज्ज्ञ असणाऱ्या व्यक्तीची नेमणूक करावी अशी मागणी केली. एरवी अधिकाऱ्यांना सांभाळून घेण्याचा लौकिक असणाऱ्या नंदकुमार घोडेले यांनी आज जोरदार हल्ला चढवला. रेणुचे मेडिकल चेकअप का करण्यात आले नाही, पिले जन्माला आल्यानंतर त्यांना अन्न पाणी दिले नाही. जोपर्यंत डाॅ. भादेकर आले नाहीत तोपर्यंत या पिलांच्या पोटात काहीच गेले नाही. यांना आपण प्राण्यांची देखभाल करण्याचा पगार देतो पण त्यांच्यात नेतेगिरी घुसली आहे. पिंजरे नाहीत म्हणून अनेक प्राण्यांना जोडीदार आणले नाहीत. मोकाट कुत्र्यांना आळा घातलेला नाही, अवैध कत्तलखाने सुरू आहेत. त्यामुळे डाॅ. नाईकवाडेंची निष्पक्ष चौकशी करा तोपर्यंत त्यांना पदावरून हटवा अशी मागणी केली. गंगाधर ढगे यांनी मनपाने डाॅ.नाईकवाडेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अय्युब जहागीरदार यांनी तर नाईकवाडे यांनी मुक्या प्राण्यांचा जीव घेतला आहे असा थेट आरोप आरोप केला. ऋषीकेश खैरे, अंकिता विधाते, जहांगीर खान, अब्दुल नाईकवाडी, मनोज गांगवे, आदींनी डाॅ. नाईकवाडे यांना पदावरून दूर करण्याची जोरदार मागणी केली.

आपण निर्दोषच; माध्यमांनी एकच बाजू मांडल्याचा आरोप
आपली बाजू मांडताना डाॅ. नाईकवाडे यांनी आपण निर्दोष असून माध्यमांनीच फक्त एक बाजू मांडली असे सांगत खापर फोडण्याचा प्रयत्न केला. पण खुलाशात त्यांनी प्रचंड विसंगत विधाने केली.
नााईकवाडे : ८००किमीचा प्रवास करून आणताना रेणुची काळजी घेण्यात आली. प्रत्येक ४० किमीनंतर गाडी थांबवून अर्धा तास विश्रांती घेतली.
वस्तुस्थिती: ४०किमी नंतर अर्ध्या तासाची विश्रांती असे कठोरपणे पाळले गेले असते तर रेणू राजाला औरंगाबादेत यायला किमान अडीच दिवस लागले असते. प्रत्यक्षात २३ तासांत त्यांना येथे आणण्यात आले. तेही टेम्पोतून.
नाईकवाडे: राजारेणू यांचा संयोग झाल्याचे रेणू गरोदर असल्याचे सांगण्यात आले होते पण प्रवासाला ती फिट असल्याचेही सांगितले.
वस्तुस्थिती: दोनदिवसांपर्यंत रेणू गरोदर असल्याचे माहीत नव्हते असे नाईकवाडे सांगत होते. शिवाय सोनोग्राफीतही ती गरोदर असल्याचे दिसून आले नाही तिचे पोटही दिसत नव्हते अशी जाहीर विधाने त्यांनी केली.
नाईकवाडे: रेणुनेतीन पिलांना जन्म दिल्यानंतर तिने पिलांना दूध पाजावे यासाठी आम्ही चार ते साडेचार तास वाट पाहिली. पण तिच्यात मातृत्वाची भावनाच नव्हती. त्यामुळे तिने पिलांना दूध दिले नाही. शेवटी शेळीचे दूध पिलांना देण्यात आले.
वस्तुस्थिती: रेणूदूध देत नाही हे समजल्यावर पिलांना दूध देण्यासाठी त्वरित हालचाली करण्याची गरज होती. पण तसे करता त्यांना एक अख्खा दिवस काहीच देण्यात आले नाही. दोन पिलांचा मृत्यू झाल्यावर डाॅ. अनिल भादेकरांना बोलावण्यात आले त्यांच्या सूचनेनंतर एका राहिलेल्या पिलाला दूध पाजण्यात आले.
नाईकवाडे : रेणूदूध देऊ शकत नव्हती. कारण एकतर ती आठ दिवस उपाशीही होती.
वस्तुस्थिती : रेणुनेअन्न खाल्ले नव्हते तर ती गरोदर असताना तिने खावे यासाठी काहीही हालचाली करण्यात आल्या नाहीत. तिच्यावर गॅस्ट्रोचे उपचार केले.
नाईकवाडे : माध्यमांतफक्त एकच बाजू प्रसिद्ध झाली. या प्रकरणात मी मुळीच दोषी नाही. वेळोवेळी तज्ज्ञांची मदत घेतली. शिवाय लहान मुलांना जसे जवळ घेतो तसे घेऊन या पिलांवर उपचार केले.
वस्तुस्थिती : रेणु,पिलांबाबत काहीच माहिती देण्यात येत नव्हती. प्रत्यक्षात प्राणिसंग्रहालयात डाॅ. भादेकर उपचार करीत असताना डाॅ. नाईकवाडे आपल्या दालनात बसून केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांना सादर करण्यात येणाऱ्या ५० कोटींची निधी मागणाऱ्या पत्रावर मंथन करीत बसले होते.
बातम्या आणखी आहेत...