आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. डकरेंचा गळा चिरणारा आरोपी १७ नव्हे २० वर्षांचा, हाडांच्या आकारावरून कळते वय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डाॅ.चित्रा डकरे खून प्रकरणातील एक आरोपी आपण अल्पवयीन आहोत, असा दावा करत होता. मात्र तो अल्पवयीन नसल्याचे उघड झाले आहे. तो २० वर्षांचा असल्याची माहिती त्याच्या बोन टेस्टवरून समोर आल्याचे पोलिस विभागातील उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. न्यायालयाच्या आदेशानुसार अमोल घुगे या आरोपीची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली. तर दुसरा आरोपी हा विधीसंघर्षग्रस्त असल्यामुळे त्याला बाल सुधारगृहात ठेवण्यात आले होते.

डिसेंबर २०१५ रोजी डॉ. चित्रा डकरे यांचा खून झाला होता. डॉ. स्नेहल नीलेश आस्वार यांनी त्यांची आई चित्रा डकरे यांच्या खूनप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून २७ फेब्रुवारी २०१६ रोजी गुन्हेशाखेने एका अल्पवयीन आरोपीला या प्रकरणी अटक केली. तो अमोल नारायण घुगेबरोबर चोरीच्या इराद्याने गेला होता. अमोलने चित्रा यांचे हात बांधले तर मी कटरने गळा चिरला, असा जबाब या विधिसंघर्षग्रस्त आरोपीने पोलिसांकडे नोंदवला होता.
पुढीस स्लाइड्सवर जाणऊन घ्या, हाडांच्या आकारावरून कसे कळते वय