आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वस्तीजवळील डोंगरांचे मॅपिंग आवश्यकच; निसर्गाला चॅलेंज करणे चुकीचेच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डोंगरांजवळ उपनगरे असणाऱ्या महानगरांनाही आता िनसर्गातील डोंगरकडे तुटणे, लागूनच असलेल्या नागरी वस्तीवर िकत्येक टनांचे डोंगर सुळके कधीही पडणे याचा धोका जाणवू लागलाय. निसर्गाला चॅलेंज करणे चुकीचेच. पण शहरातील महागड्या जमिनीला डोंगरपायथ्याचे काय, िबल्डर लाॅबी वजनदार असल्याने परवानग्या िमळवल्या जातात. वन खात्याचे, भूगर्भ खात्याचे िनयम डावलून (डोंगर पायथ्यापासून ३०० मीटर्सच्या आत नागरी वसाहत उभारता येत नाही) वसाहती उभ्या राहतात.

औरंगाबादसारख्या शहरात डोंगराला लागूनच वसाहती होऊ लागल्या आहेत. हेच िचत्र सर्वत्र आहे. शहराजवळील मनपा हद्दीबाहेरील, प्रसंगी डोंगराजवळील (ग्रामपंचायत हद्दीतील) जमिनी घ्यायच्या अन् ग्रामपंचायतीची परवानगी काढून फ्लॅट, रो-हाऊस, बंगले बांधायचे असे प्रकार होताहेत.
भूपुरातत्त्वशास्त्रात अशी अनेक उदाहरणे आहेत (उदा. भूकंप, वादळे, अतिवृष्टी, नद्यांचे प्रवाह बदलणे, आदींमुळे गावे जमिनीत गाडली जाणे आदी). कुठल्याही उत्खननात गावे कशी गाडली गेली, त्याच िठकाणी िकतीदा हे गाव पडले, परत वसले, भूकंपामुळे नद्यांचे प्रवाह कसे बदलले हे पुरातत्त्वीय उत्खनन तंत्रातील थरशास्त्रानुसार (स्ट्रॅटीग्राफी) कळते. (उदा - मोहेंजोदडो-हडप्पा, द्वारका, सरस्वती नदीचा बदलता मार्ग, महाराष्ट्रातील नेवासे, प्रकाशे वा पैठणमधील प्राथमिक उत्खनने)

पूर्वी िनसर्गाच्या कुशीतील वसाहतींना वा ऐतिहासिक गावांना मानवी हस्तक्षेप, प्रदूषण, उद्योग, पर्यावरण असंतुलनाचा धोका नव्हता, आता तो आहे. आजच्या िपढीला पटेल असे उदाहरण द्यायचे झाले तर आजच्याप्रमाणे िहमालय वितळणे, अंटार्क्टिकावरील बर्फ िवतळणे, हवामान बदलून कमी पाऊस, अति उष्णता, अण्वस्त्रनिर्मिती, जल-वायू-प्रदूषण, ओझोन वायूचा थर कमी होणे याचा स्लो पाॅयझनप्रमाणे दुष्परिणाम होतोय. ओझोन थर कमी वा विरळ झाल्याने सूर्यप्रकाशाचे िकरण थेट पृथ्वीतलावर येताहेत त्यामुळे उष्णता वाढून बर्फकडे िवतळून सागराची पातळी वाढतेय. या पार्श्वभूमीवर डोंगरांची-वनांची काळजी घेणे आवश्यक आहे. मानवी वस्तीला वाचवण्यासाठी डोंगरपायथ्यास वसाहती बांधणे टाळावे. कारण आता सह्याद्री अभेद्य राहिला नाहीये. ज्वालामुखीच्या रसापासून बेसॉल्ट दगड तयार झालाय, मात्र करडा, कणखर काळ्या कातळाचा सह्यकडा हा प्रथम दर्जाचा मजबूत दगड आहे. मराठवाड्याचा बेसॉल्ट डोंगराच्या वरच्या बाजूस दुसऱ्या दर्जाचा आहे तो हवामान, प्रदूषणाने सच्छिद्र झालेला दगड आहे. त्याचा पाया मात्र मजबूत भरीव बेसॉल्टचा आहे. बेसॉल्टच्या या दोन टप्प्यांत काहीशी मातीही (मुरूम स्वरूपातील) असते. त्या मातीचीही दगडात रूपांतरित होण्याची प्रक्रिया सुरू असते. त्यादरम्यान मानवी हस्तक्षेप झाला नाही तर हा दगड कालौघात पक्का होत जातो. मात्र, साधारणत: असे िदसून आले की शहराजवळील डोंगरटेकड्यावरील सुळके वा एखादा उंचावरील दगडाचा थर हा हात लावला की दगड मातीसारखा भुरभुर गळून पडतो. (उदा. औरंगाबाद शहरातील पैठण रस्त्यावरील वाल्मीचा डोंगर) दगड सच्छिद्र होतो आणि या डोंगररांगातून एखादा बाजूला स्वतंत्र असलेला िकल्ल्यासारखा गोल-लांबोळा-चौकोनी आकाराच्या डोंगरांवरून (हनुमान टेकडी, साताऱ्याचा डोंगर, औरंगाबाद) माती दरडी-दगड पडण्याचा धोका जास्त असतो, असे भूगर्भतज्ज्ञांचे मत आहे. नेमके याच डोंगराभोवती िचकटून वसाहती होताना िदसतात. त्यामुळे येथे उपाययोजना असाव्यात, नसता कल्पना करा की एखादा १-२ टनांचा दगड त्या उंचीवरून डोंगरावरून घरंगळत आला पायथ्याशी असलेल्या वस्तीवर वा इमारतीवर पडल्यास काय होईल याची अशी अनेक उदाहरणे राज्यात तसेच औरंगाबादेतही आहेत. उदा-औरंगाबाद बुद्धलेणी येथे दरड, मोठा दगड कोसळल्याने लेणीवर येण्याचा मार्ग बांधकाम करून बदलला आहे. त्याजवळील हनुमान टेकडीखाली वस्तीदेखील आहे.

भूगर्भतज्ज्ञांनी सुचवलेल्या उपाययोजना
यावर उपाय म्हणजे धोकादायक मानवी वस्तीजवळील डोंगरांचे तरी मॅपिंग करणे, अशा धोकादायक टेकड्या वा डोंगररांगापासून तीनशे मीटरपर्यंत बांधकामास परवानगी देणे, तसेच डोंगरांवर टाॅप टू बाॅटम दाट वनीकरण, जे डोंगरातील दगड मातीची धूप होण्यापासून वाचवेल एखादा कडा वा दगड कोसळ्यास ते झाडे रोखतील.

प्रसंगी त्या भुसभुशीत झालेल्या भागावर लोखंडी जाळ्याचे नेट लावणे (खंडाळा घाटात लावले त्याप्रमाणे) खाली मानवी वस्तीआधी िरटेनिंग वाॅल म्हणजे संरक्षक िभंत बांधावी, जेणेकरून डोंगरावरून कोसळणारी मुरूम माती-दगड थेट मानवी वस्तीवर येणार नाही. - डोंगर टेकड्यावरून येणारे अगदी छोटे-छोटे जलप्रपात अडवणे वा वळवणे. पाण्याला वाहण्यास जागा देणे. डोंगरटेकड्यांवरील वरच्या भागातील दगडाचा सर्व्हे-तपासणी करणे. पायथ्याचा मुरूम, वृक्ष तोडणे. औद्योगिकीकरणातून येणारे वायू-जलप्रदूषण रोखणे. मात्र हे सर्व करण्यासाठी हवी जबर इच्छाशक्ती.

पुढील स्लाइडवर वाचा, जागतिक वारशाचे नुकसान

(पुरातत्वज्ज्ञ, औरंगाबाद.)
बातम्या आणखी आहेत...