आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदवी, पदव्युत्तरच्या परीक्षा लांबणीवर, प्रात्यक्षिकांमुळे परीक्षा लांबण्याची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने बीएस्सीच्या प्रात्यक्षिक परीक्षा पुढे ढकलल्यामुळे परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रकच कोलमडलेले आहे. परीक्षा नियंत्रक डॉ. डी. एम. नेटकेंनी यापूर्वी फेब्रुवारी रोजी प्रात्यक्षिक परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जारी केले होते. त्यामुळे पदवी आणि पदव्युत्तरच्या लेखी परीक्षादेखील लांबणीवर पडण्याची शक्यता ‘दिव्य मराठी’ने एका वृत्तात वर्तवली होती. सोमवारी (२० फेब्रुवारी) अखेर पदवीसह पीजीच्या परीक्षा पुढे ढकल्याचे जाहीर केले. 

१५ ते २८ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षा जि.प. निवडणुकांमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या. शिवाय बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षाही याच दरम्यान घेण्यात येत असल्यामुळे बामुक्टाने फेब्रुवारीला पदवीच्या प्रात्यक्षिक परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यानुसार डॉ. नेटके यांनी फेब्रुवारीला परिपत्रक जारी करून १५ ते २८ फेब्रुवारीऐवजी २० फेब्रुवारी ते मार्चदरम्यान प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येत असल्याचे सांगितले. त्यामुळे पदवीच्या लेखी परीक्षा आणखी पंधरा दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता ‘दिव्य मराठी’ने १० फेब्रुवारीच्या अंकात ‘विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर” या शीर्षकाखाली प्रसिद्ध केली होती. 

सोमवारी (२० फेब्रुवारी) अखेर डॉ. नेटके यांनी सर्वच परीक्षांना लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. नियोजित वेळापत्रकानुसार मार्चपासून पदवीच्या परीक्षांना प्रारंभ होणार होता. आता सुमारे बारा दिवस उशिराने म्हणजेच १६ मार्चपासून पदवीच्या लेखी परीक्षांना सुरुवात होणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार २० फेब्रुवारी ते मार्चदरम्यान बीएस्सीच्या प्रात्यक्षिक परीक्षा होतील. बीएस्सीच्या प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षातील दुसरे, चौथे, पाचवे आणि सहाव्या सत्रांसाठी हा बदल करण्यात आल्याचे फेब्रुवारीच्या परिपत्रकात उल्लेख आहे. आता १६ मार्च ते एप्रिलपर्यंत पदवीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. 

त्यामध्ये सर्व विषयांतील बीएस्सी, बी.ए., बी.कॉम., बी.एस.डब्ल्यू. आदींसह एकूण २६ अभ्यासक्रमांच्या पदवी परीक्षा आता १६ मार्चपासून सुरू होतील. आधी प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे पदवीच्या लेखी परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या आहेत. पदवीमुळे आता पदव्युत्तर पदवीच्या परीक्षाही १५ मार्चऐवजी २४ मार्चपासून सुरू होणार आहेत. सर्व प्रकारचे एम. ए., सर्व प्रकारचे एमएस्सी, एमलिब, एमएसडब्ल्यू, एलएलएम, बी.जे., एमकॉम, डीबीएम, एमबीए, एमआयबी, एमसीए एमएड, बीएड, बीपीएड, एमपीएड आदींसह एकूण ६३ अभ्यासक्रमांच्या परीक्षा आता २४ मार्च ते एप्रिलअखेरपर्यंत चालणार आहेत. 
बातम्या आणखी आहेत...