आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद : बी. ए. इंटरनॅशनलला नऊ वर्षांनंतर मान्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जनसंपर्क वृत्तपत्रविद्या विभागातील विद्यार्थ्यांना बीए इंटरनॅशनलची पदवी लवकरच मिळणार आहे. कुलपती तथा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी पदवीला मान्यता प्रदान केली आहे. त्यामुळे नऊ वर्षांपासून अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 
 
युनोस्कोच्या सहकार्याने बी. ए. इंटरनॅशनल जर्नालिझम आर्ट्स अँड सायन्स हा अभ्यासक्रम २००९ मध्ये वृत्तपत्रविद्या जनसंवाद विभागात सुरू करण्यात आला होता. विभागाने या पदवीला मान्यता घेण्याच्या आधीच अभ्यासक्रम सुरू केला होता. आता अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण करूनही त्यांच्या हाती पदवी प्रमाणपत्र पडलेले नव्हते. विदेशात गेलेल्या विद्यार्थ्यांनाही नोकरी मिळण्यात अडचणी निर्माण झालेल्या होत्या. विद्यार्थ्यांनी ओरड केल्यानंतर विभागाने राज्यपालांकडे मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला होता. डॉ. चोपडे आणि परीक्षा मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. राजेश रगडे यांनी राजभवन यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्यानंतर गुरुवारी हा तिढा सुटला आहे.