आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्लाहला सर्वात नापसंत असलेली बाब म्हणजे 'तलाक'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पवित्र कुराणच्या सुरा अल - बकरा, सुरा अन् निसा आणि सुरा अत - तलाकमध्ये स्पष्ट निर्देश दिले आहेत. ते असे. 
आधी तडजोड ‘जर त्या तुम्हाला पसंत नसतील तर शक्यता आहे की (केवळ) एखादी गोष्ट तुम्हाला पसंत नसेल. परंतु, अल्लाहने त्यांच्यात बरेचसे सद््गुण ठेवले असतील जे तुमच्यासाठी लाभदायक असावेत.’ (सुरा अन् निसा ४-११). प्रेषित मुहम्मद म्हणतात ‘पतीने पत्नीचा तिरस्कार करू नये. जर तिची एखादी सवय तुम्हाला पसंत नसेल तर अन्य सवयी तुम्हाला पसंत असतील.’ (सहीह मुस्लिम) त्यातूनही वितुष्ट निर्माण झाले तर वडीलधाऱ्यांनी समेटाचा प्रयत्न करावा. ते समझोता घडवू इच्छित असतील तर अल्लाह समेटासाठी अनुकूलता निर्माण करेल. (सुरा अन् निसा ४-३५) 

समाजाचे प्रयत्न : समुपदेशनाची तरतूद असून त्यासाठी जागोजागी ‘दारूल कजा’ स्थापन केले आहेत. 
 
पुनर्विचाराची तरतूद : तरीही जर प्रश्न सुटत नसेल तर शेवटी तलाकचा पर्याय आहे. अल्लाहला सर्वात नापसंत असणारी बाब म्हणजे तलाक आहे. तो देताना पतीने पत्नीला आपला इरादा बोलू दाखवावा. म्हणजेच तलाक असे एकदा म्हणावे. परंतु, प्रत्यक्षात तलाक लागू होण्याआधी इस्लाम पतीला पुनर्विचारासाठी महिन्यांचा काळ देतो. या काळात पत्नी पतीच्या घरीच मुक्कामासाठी (शारीरिक संबंध ठेवता येत नाहीत) असेल.या काळात तिची काळजी, तिला चांगली वागणूके, तिचा आर्थिक भार पेलणे पतीचे कर्तव्य आहे. या काळात पतीला चूक लक्षात आली तर तो समेट करू शकतो. पण तलाक देण्यावर ठाम असेल तर मुदतीनंतर तलाक लागू होतो. तिसऱ्या वेळेस तलाकानंतर पतीला पुनर्विचाराचा अधिकार राहत नाही.
बातम्या आणखी आहेत...