आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्यातील वेगळेपण सिद्ध करा, माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांचा विद्यार्थ्यांना संदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल, तर आपल्यात असलेले वेगळेपण अभ्यासू वृत्तीने सिद्ध करा, असा संदेश माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी विद्यार्थ्यांना लिखित भाषणाद्वारे दिला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शनिवारी व्ही. आर. सावंत व्याख्यानमालेच्या निमित्त विद्यार्थ्यांना संबोधित करणार होते. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते येऊ शकले नाहीत. तथापि विद्यार्थ्यांची निराशा होऊ नये म्हणून कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांचा दौरा रद्द झाला असला तरी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा मार्ग काढला. कार्यक्रमासाठी त्यांनी तयार केलेले भाषण ई मेलवर टाकून विद्यार्थ्यांची नाराजी दूर केली आहे.

डॉ. कलाम यांनी भाषणात म्हटले, विसाव्या वर्षांपूर्वीच तरुणांनी ध्येय समोर ठेवले पाहिजे. तेवढेच करून भागणार नाही तर त्यासाठी ज्ञानसाधनेची तयारी ठेवावी. अखंड पर्शिम, संघर्षावर मात करत यशाकडे वाटचाल करावी. चिकाटी, जिद्दीच्या माध्यमातून तुमच्यातील वेगळेपण शोधावे. प्रत्येकामध्ये इच्छाशक्ती, आत्मविश्वास हवा की, मी सर्वसामान्य नव्हे तर कोणीतरी वेगळा आहे. ही स्वत:तील वेगळेपणाची जाण तुम्हाला यशाकडे घेऊन जाते. आत्मविश्वास व येणार्‍या अडचणींवर मात करण्याची तयारी असेल तर भविष्याविषयी कसलीच भीती बाळगण्याची गरज नाही. आपल्यील कार्यक्षमता वाढवण्यासाठी सांघिक प्रयत्न फार महत्त्वाचे आहेत. प्रत्येकाला स्वत:ची ओळख निर्माण करायची इच्छा असते. मात्र, भोवतालचे वातावरण अडथळे निर्माण करतात, अशा परिस्थितीत स्वत्व जपण्याची लढाई आयुष्यात फार महत्त्वाची असते. संशोधन नव्या आव्हानांबरोबर नवी दालने उघडी होतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांनीही ही नवी आव्हाने स्वीकारावीत व ती पूर्णत्वास न्यावीत असा मोलाचा संदेश डॉ. कलाम यांनी आपल्या भाषणातून दिला.