आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लई मजबूत भीमाचा किल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२४ वी जयंती शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. आबालवृद्धांपासून तरुणांपर्यंत प्रत्येकाचा उत्साह शिगेला पोहोचलेला होता. "तुम्ही करा कितीबी हल्ला, लई मजबूत भीमाचा किल्ला...' या व अशा जोशपूर्ण गीतांनी अवघा परिसर दणाणून गेला.
क्रांती चौकातून निघालेल्या विविध मंडळांच्या शोभायात्रा आणि सामाजकि विषयावरील देखावे मिरवणुकीचे वैशिष्ट्य होते. पैठण गेट, गुलमंडी, भडकल गेटसह टीव्ही सेंटर आणि सिडको भागात भीमसैनकिांनी अलोट गर्दी केली होती. सुंदर शब्दांत गुंफलेली भीमगीते आणि त्यावर जल्लोषात थिरकणारी तरुणाई वातावरण भारावून टाकणारी होती. मंडळाच्या स्वागतासाठी विविध राजकीय पक्ष, संस्था आणि संघटनांनी चौकाचौकांत व्यासपीठे उभारली होती.
ढोल पथकाचे आकर्षण
डीजेपेक्षा या वेळी मंडळांनी पारंपरकि वाद्यांना प्राधान्य दिले. झांज पथक आणि ढोल-ताशांच्या निनादाने परिसर दणाणून गेला होता. आकर्षक रोषणाई आणि पारंपरकि वाद्यांमुळे वातावरणात वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. मिरवणुकीतील प्रत्येक गाडीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सुंदर प्रतिकृती आणि सुविचार लिहिलेले होते. काही मंडळांनी दुष्काळ, मतदान अशा सामाजिक विषयावर देखावे सादर केले. पदमपुऱ्यातील मैत्रेय क्रीडा मंडळाच्या ढोल पथकाने सगळ्यांचे लक्ष वेधले. याशिवाय किलेअर्कच्या पंचशीला क्रीडा मंडळाने मानवी मनोरे करून सर्वांना आश्चर्यचकित केले. राजू जगधने मित्रमंडळ, शाक्यपुत्र व्यायामशाळा व क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळाने बाबासाहेबांची सजीव प्रतिकृती उभारून "शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा' असा संदेश दिला. क्रांती चौकातून निघालेल्या मिरवणुकीचा समारोप भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला. मुख्य मिरवणूक क्रांती चौक, पैठण गेट टिळक पथ, गुलमंडी, सिटी चौक, जुना बाजार मार्गे भडकल गेट येथे गेली. पोलिस प्रशासन आणि स्वयंसेवकांच्या अथक प्रयत्नाने हा जयंती महोत्सव अानंदाने आणि शांततेत पार पडला.

राष्ट्रक्रांती संघ, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस, नागसेन मित्रमंडळ, रावसाहेब दारकोंडे मित्रमंडळ, एसबीएच जनकल्याण संघटना, डिफेन्स मुव्हमेंट, संजय शिरसाट मित्रमंडळ, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया धम्म परिषद, युवा प्रगती मित्रमंडळ, राष्ट्रवादी काँग्रेस, पँथर्स रिपब्लिकन पार्टी, रविराज जाधव मित्र मंडळ, समता सैनिक दल, संघर्ष युवा मंच, महात्मा फुले सामाजिक समता प्रतिष्ठान, भारिप बहुजन मित्र मंडळ, बहुजन मुक्ती पार्टी, सिटी चौक पोलिस ठाणे आदी संस्था संघटना आणि पक्षाच्या वतीने मंडळाचे स्वागत करण्यात आले.

मिरवणुकीत दिग्गज नेते, उमेदवारांची हजेरी
लाल दिव्याची गाडी मिळवण्यासाठी हा महोत्सव अतिशय महत्त्वाचा हे प्रत्येक महापालकिा निवडणुकीतील उमेदवाराने हेरले होते. सत्ता मिळवण्यासाठी हा भीमसागर आपल्या पाठीशी हवा याची प्रत्येक उमेदवाराला जाणीव होती. यासाठी राजकीय नेते कसोशीने प्रयत्न करताना दिसले. जेव्हा केव्हा कवी वामनदादा कर्डक यांच्या अनुयायांनी प्रसदि्ध केलेले भीमगीत व्यासपीठावर वाजत तेव्हा मतदारांची नजर आपल्या उमेदवाराकडे गेल्याशिवाय राहत नव्हती. निवडणुकीमुळे अनेक पुढाऱ्यांचे वेगळे रूप पाहायला मिळाले. सकाळपासूनच वाॅर्डावाॅर्डातील विविध चौकांत बाबासाहेबांच्या प्रतिमांना अभिवादन करून पुष्पगुच्छ अर्पण करण्यात येत होते. मिरवणुकीतदेखील विविध पक्षांच्या दिग्गज नेत्यांबरोबर उमेदवारांनी हजेरी लावून आपल्या वाॅर्डाचे प्रतिनिधति्व केले. काँग्रेस, राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, एमआयएम, आरपीआय, भारिप, बसप, कम्युनिस्ट या पक्षांचे बॅनर आणि होर्डिंग स्पष्टपणे व्यासपीठावर दिसत नसले तरी त्याचे उमेदवार आणि नेते मात्र व्यासपीठावरून जनतेला अभिवादन करताना दिसत होते. अनेकांनी आपल्या आवडत्या नेत्याला व्यासपीठावरून खाली उतरून आपल्या सोबत नाचायला भाग पाडले. रात्री उशिरापर्यंत हा उत्साह वाढतच होता.
इतर फोटो, पुढील स्लाईडवर...