आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पानसरेंवरील हल्ल्याचा तातडीने शोध लावण्यासाठी निवेदन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - पुरोगामी चळवळीचे गोविंद पानसरे त्यांच्या पत्नीवर झालेल्या भ्याड हल्ला प्रकरणातील गुन्हेगारांचा तातडीने शोध लावून अशा प्रवृत्तींना कडक शिक्षा करावी, अशा आशयाचे निवेदन वाळूज एमआयडीसी पोलिसांना मंगळवारी (१७ फेब्रुवारी) देण्यात आले.
त्याचबरोबर पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. या निवेदनावर शौकत शेख, भीमराव कीर्तिकर, पांडुरंग सातदिवे, लक्ष्मण निसाळे, बबनराव इंगोले, भीमराव मोरे, प्रशांत गोडसे, अंकुश कानडे, दीपक सदावर्ते, रामनाथ कानडे, अण्णासाहेब महांकाळे, छगन गवळी, भगवान बागूल, राहुल जाधव, एस. यू. सोनवळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
वाळूजलाही हल्ल्याचा तीव्र निषेध

हा भ्याड हल्ला असून त्याचा जाहीर निषेध करण्यात येतो. पोलिसांनी हल्लेखोरांना तातडीने शासन करावे, अशी मागणी या वेळी वाळूजकरांनी केली. ग्रामपंचायत सदस्य अंकुश गायकवाड, नंदकुमार राऊत, इब्राहिम पटेल, नंदकिशोर काबरा, बबनराव गायकवाड, शरदचंद्र अभंग, मुकेश बोहरा, रशीद शेख, अन्सारखाँ पठाण, विजय साबळे, लक्ष्मण राऊत, नदीम झुंबरवाला यांची या वेळी उपस्थिती होती.