आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्हीही पानसरे, आम्हाला गोळ्या घाला, हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ.गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात सोमवारी पैठण गेटवर डाव्या संघटनांच्या नेत्यांनी आंदोलन केले. "आम्ही सारे पानसरे, आम्हालाही गोळ्या घाला,' अशा घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

या वेळी भालचंद्र कांगो, राम बाहेती, सुभाष लोमटे, गंगाधर गाडे, अविनाश डोळस, मनोहर टाकसाळ, पंडित मुंडे, भीमराव बनसोड, बुद्धप्रिय कबीर, अभय टाकसाळ यासह अनेक नेत्यांची उपस्थिती होती. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी मोकाट फिरत आहे. त्यातच पानसरे यांच्यावर हल्ला झाल्याने आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला. "गांधी हम शर्मिंदा हैं, तेरे कातील जिंदा हैं', "जो हिटलर की चाल चलेगा हिटलर की मौत मरेगा', "भ्याड हल्ल्याच्या निषेध असो' अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. आंदोलनात डाव्या चळवळीतील, आरपीआय, भारिप, आम आदमी पक्ष यासह इतर संघटनांचे प्रतिनिधीदेखील सहभागी झाले होते.

हल्लेखोरांना अटक करा

चळवळीत राहून लोकांना न्याय देण्याबाबतची शिकवण पानसरे यांच्याकडून सर्वांना मिळाली. ८२ वर्षांच्या नेत्यावर अशा प्रकारे हल्ले होणे निषेधार्ह आहे. हल्लेखोरांवर तातडीने कारवाई व्हायला हवी. जयश्रीगायकवाड, महाराष्ट्र कार्याध्यक्ष, मोलकरीण संघटना

विचारांची लढाई हवी

^हाहल्ला परिवर्तनवादी विचारावर धर्मांध शक्तींनी केलेला हल्ला आहे. मात्र, विचारांची लढाई ही विचारांनी लढली पाहिजे. दाभोलकरांच्या हल्ल्यानंतर अशा प्रवृत्ती डोके वर काढत आहेत. हल्लेखोरांना कडक शासन व्हावे. प्रा.अविनाश डोळस, नेते भारिप बहुजन महासंघ

लोकशाहीला सुरूंग

^समाज परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करणारे काम पानसरे करत आहेत. मात्र, परिवर्तनाच्या काम करणाऱ्याच्या विरोधात जातीय शक्तींनी आज डोके वर काढले आहे. असे हल्ले लोकशाहीला सुरूंग लावण्याचा कट अाहे. गंगाधरगाडे, नेते, पँथर्स रिपब्लिकन पार्टी.

जातीयवादी शक्तीचा हात

^भाकपच्या अधिवेशनाची ते तयारी करत होते, तर "खरा शिवाजी कोण' या पुस्तकाद्वारे त्यांनी प्रबोधन सुरू केले होते. त्यामुळे जातीयवादी शक्ती संतप्त झाल्या होत्या. दाभोलकरांच्या हत्येपासून जातीयवाद्यांनी डोके वर काढले आहे. भालचंद्रकांगो, नेते भाकप

असंघटित लोकांसाठी भरीव योगदान

^पानसरे असंघटित क्षेत्रातल्या लोकांसाठी काम करत होते. धर्मांध शक्तीच्या विरोधातही त्यांनी आवाज उठवला होता. "खरा शिवाजी कोण' या पुस्तकाच्या दीड लाखापेक्षा जास्त प्रती विकल्या होत्या. त्यामुळे जातीयवादी लोक भडकले होते. त्यातून हा भ्याड हल्ला झाला असावा. रामबाहेती, नेते भाकप.

देशात धर्मांध शक्तीचा जोर वाढला

^केंद्र राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर जातीय धर्मांध शक्ती वाढत चालल्या आहेत. दाभोलकरांच्या हत्येनंतर मारेकऱ्यांचे मनोबल वाढले आहे. हल्ले होणार नाहीत याची काळजी प्रशासनाने घ्यावी. हल्लेखोरांना तातडीने अटक होणे गरजेचे आहे. सुभाषलोमटे, नेते, आप