आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr Pulkeshi Pratibha Kulkarni Return Form Nepal Earthquake

सर्वांना मदत करणार्‍या त्सेरिंग लारकेमध्ये जणू देव दिसला!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. पुलकेशी आणि डॉ. प्रतिभा कुलकर्णी यांचे नेपाळमधील छायाचित्र. - Divya Marathi
डॉ. पुलकेशी आणि डॉ. प्रतिभा कुलकर्णी यांचे नेपाळमधील छायाचित्र.
औरंगाबाद - माणूस म्हणून आयुष्यात अनेक चांगल्या-वाईट माणसांशी आपली भेट होत असते. संकटकाळात मदत केलेला माणूस तर आपल्यासाठी देवासमान असतो, परंतु त्सेरिंग लारके नावाचा माणूस आपला सर्व आर्थिक फायदा बाजूला ठेवून जेव्हा हजारो लोकांची मदत करतो, तेव्हा आम्हाला त्या "त्सेरिंगमध्ये' देव दिसला. भूकंप झाल्यानंतर नेपाळच्या लुक्मा या छोट्याशा गावात व्यावसायिक असलेल्या त्सेरिंग यांनी माणुसकीचे सर्वोच्च दर्शन घडवले असल्याची भावना नेपाळहून शुक्रवारी (१ मे) परतलेले शहरातील डॉ. पुलकेशी प्रतिभा कुलकर्णी यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना व्यक्त केली. कुलकर्णी यांनी सांगितलेला नेपाळ भूकंप परिस्थितीतला प्रसंग त्यांच्याच शब्दांत...

"भूकंप झाला तेव्हा आम्ही नामचेबाजार (काठमांडूपासून ८० किलोमीटर, एव्हरेस्टकडे जाण्यापूर्वीचा महत्त्वाचा थांबा) या गावामध्ये होतो. दोन दिवस तेथे राहिल्यानंतर त्याअलीकडे ट्रेकिंग सुरू झालेल्या लुक्मा गावात आम्ही एका खासगी हेलिकॉप्टरने परतलो. गिर्यारोहणासाठी जवळपास ते हजार गिर्यारोहक त्या वेळेस लुक्मा गावात थांबले. अर्धेअधिक हॉटेलचालक हॉटेल तसेच सोडून निघून गेले होते. ट्रेकिंगसाठी जेव्हा आम्ही निघालो तेव्हाच त्सेरिंग यांच्या हॉटेलचे बुकिंग केले होते. भूकंप झाल्यानंतर जेव्हा तेथे परतलो तेव्हा हॉटेल खच्चून भरले होते. ना राहण्यासाठी जागा ना खाण्यासाठी काही मिळेना. परंतु त्सेरिंग स्वत: पर्यटकांची व्यवस्था करण्यात मग्न होते. आलेल्या कुठल्याही पर्यटकाला त्यांनी परत पाठवता स्वत: हॉटेलमध्ये मिळेल तिथे जागा करून देत होते. प्रत्येकासाठी खाण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करत होते.

कुलकर्णी दांपत्य त्यांची टीम जेव्हा हॉटेलमध्ये पोहाेचली तेव्हा त्यांनी स्वत:च्या केबिनमध्ये जागा करून दिली. भूकंपाची परिस्थिती असल्याने राहणे, खाण्याची आबाळ असताना कुलकर्णी यांच्या टीमचे कॅप्टन पायी चालताना डोक्यावर पडून त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करणे अत्यावश्यक होते. तेव्हा त्सेरिंग यांनी स्वत: विमानाच्या कंपनीला फोन करून ओळखीने तिकिटाचे पैसे देऊन दोन सीट बुक केले. त्यांची काठमांडूपर्यंत जाण्याची व्यवस्था करून तेथील रुग्णालयात दाखल करण्यासाठीही शिफारस केली. संपूर्ण हॉटेल भरगच्च भरलेले असताना प्रत्येक पर्यटकाची काळजी घेऊन त्यांची जाण्यापर्यंत व्यवस्था करण्यात तीन दिवस ते व्यग्रच होते. एकाही पर्यटकाला त्यांनी पैसे मागितले नाहीत. कुलकर्णी दांपत्याने त्यांना पैसे घेण्याची विनवणी केली असता माझा बँक अकाउंट क्रमांक घ्या जेव्हा आपल्या घरी सुखरूप पोहोचाल तेव्हाच अकाउंटमध्ये पैसे जमा करा, असे त्यांनी सांगितले. एवढ्या बिकट परिस्थितीतही "काहीही होणार नाही, सगळे नीट होईल, घाबरू नका, धीर धरा' असे म्हणत ते पर्यटकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम करत होते. असा माणूस विरळाच असल्याची भावना प्रतिभा कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
लाकडाच्या हॉटेलमुळे बचावलो
नामची बाजार येथे सकाळी पोहोचल्यानंतर आम्ही टेकडीवरून एकदा जाऊन आलो. आल्यानंतर आमच्या हॉटेलमध्ये सकाळी ११.३० च्या सुमारास नाष्टा करत होतो. अचानक आमचा टेबल हलू लागला. क्षणभरात मोठा आवाज ऐकू आला. सर्व हॉटेल डोलू लागले. हॉटेलमालकाला कळताच "पळा पळा, भूकंप आहे,' असे ओरडल्यावर आम्ही हॉटेलच्या बाहेर पडलो. हॉटेल लाकडाचे होते म्हणून बचावलो. परिसरातील इतर हॉटेल, घरे पत्त्यासारखी कोसळताना पाहिली. त्यानंतर जवळपास २४ तास उपाशीच राहिलो.

माणुसकी विसरले
पुण्याहूनआलेल्याच एका टीममधील माणसासाठी भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर लुक्ला येथे पोहोचले. परंतु आमच्या टीममधील एका महिलेला ताप आला होता. तेव्हा अधिकार्‍यांना किमान त्या महिलेला त्यांच्या पतीला घेऊन जाण्याची विनंती केली. परंतु नकार देत केवळ ते पुण्याच्या टीमला घेऊन गेले. जाताना आम्ही अर्ध्या तासात पुन्हा येऊ, असे सांगून गेले. परंतु तीन दिवस काही ते परतले नाहीत. केवळ याच घटनेचा प्रचंड राग आला.

महाराष्ट्र सदनाचेही आभार
भारतात३० एप्रिल रोजी रात्री वाजता दिल्ली विमानतळावर पोहोचलो, तेव्हा महाराष्ट्र सदनाचे अधिकारी तेथे उपस्थित हाेते. मराठी पर्यटक येताच त्यांच्याजवळ जाऊन त्यांची विचारपूस करत सर्वांना सदनामध्ये नेले. दुसर्‍या दिवशी अगदी आदरातिथ्याने खाण्यापिण्याची व्यवस्था करून तिकीट काढून विमानतळापर्यंत पोहोचवले. सदनाच्या सर्व अधिकार्‍यांची तत्परता मदतही वाखाणण्याजोगी असल्याचे त्यांनी सांगितले.

१५ मिनिटांमध्ये औरंगाबादहून कॉल
भूकंपझाला म्हणून पळत वरच्या सुरक्षित मैदानावर पोहोचलो. नेमके काय होते हे कळायच्या आतच १५ मिनिटांच्या अंतराने औरंगाबादच्या मित्रांचा कसे आहात, हे विचारण्यासाठी कॉल आला आणि त्यानंतर नेपाळसह भारतातही भूकंप झाल्याचे कळले.